Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड ‘मिस्टर इंडिया’ सिनेमातील छोटी टीना आठवते का? इतक्या वर्षात एवढा बदलला तिचा लूक

‘मिस्टर इंडिया’ सिनेमातील छोटी टीना आठवते का? इतक्या वर्षात एवढा बदलला तिचा लूक

चित्रपटांमधून अनेक बालकलाकार खूप कमी वयात त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवतात. हे बालकलाकार त्यांच्या अभिनयामुळे प्रसिद्ध होतात आणि त्यांना तुफान लोकप्रियता मिळते. काही कलाकार तर त्यांच्या मोजक्या भूमिकांमुळे कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या मनात कोरल्या जातात. यातले बरेच बालकलाकार मोठे झाल्यावर चित्रपटांमध्येच करिअर करतात तर काही वेगळ्या क्षेत्राची करिअर म्हणून निवड करतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका बालकलाकाराबद्दल सांगणार आहोत जो आता चित्रपटांमध्ये दिसत नाही.

huzaan khodaiji

अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची मुख्य भूमिका असलेला ‘मिस्टर इंडिया’ हा सिनेमा सर्वांनाच आठवत असेल. जुन्या किंवा आताच्या काळातील असा कोणताच व्यक्ती नसेल ज्याने हा सिनेमा पाहिला नाईल. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत अनिल कपूर, श्रीदेवी, अमरीश पुरी यांच्यासह सर्वच बालकलाकारांच्या भूमिका खूपच गाजल्या. चित्रपटातील बालकलाकारांमध्ये एक असे पात्र होते ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून तर घेतले मात्र त्या पत्राने खूप प्रेम देखील मिळवले. ते पात्र म्हणजे ‘टीना’ या छोट्या गोंडस चिमुरडीचे. चित्रपटात बॉम्ब ब्लास्टमध्ये टिनाचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले होते. या चित्रपटात टिनाची भूमिका साकारली होती हुजान खोदैजीने. हुजान आता भरपूर मोठी झाली असून तिचे वय आता ४१ वर्षांची झाली असून तिला दोन मुली देखील आहेत. ही भूमिका तिने केली तेव्हा ती केवळ ६ वर्षांची होती.हुजानने या सिनेमात साकारलेल्या भूमिकेला तुफान लोकप्रियता मिळाली. मात्र असे असूनही तिने चित्रपटसृष्टीत तिचे करिअर न करता दुसऱ्या क्षेत्राला प्राधान्य दिले. तिने असे का केले असावे असा प्रश्न अनेकांना पडला होता. तेव्हा एका मुलाखतीमध्ये तिने यावर बोलताना सांगितले होते की. “मला लोकांच्या नजरेत यायला खूप काही आवडत नाही. ‘मिस्टर इंडिया’ सिनेमाच्या शुटिंगनंतर मी बाहेरगावी निघून गेले. माझे वडील मिस्टर इंडिया चित्रपटाचे कास्टिंग दिग्दर्शक होते. मी त्या चित्रपटाच्या ऑडिशनला गेले आणि तिथेच माझी निवडही झाली. या चित्रपटानंतर मी काही जाहिरातींमध्ये काम तर केले. पण, यामुळे मी लोकांच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरत गेली आणि माझ्यावर खूप दडपण यायला लागले.’ हुजान सध्या एका जाहिरात कंपनीत एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा