Thursday, July 18, 2024

‘सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहात’, म्हणत मानसी नाईकने तिच्या अहोंना दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेत्री मानसी नाईक ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाने तर तिने चाहत्यांच्या मनात खास जागा बनवली आहेच. परंतु खास करून तिने तिच्या डान्स कौशल्याने सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित केले आहे. अनेक गाण्यांवर तिने डान्स केला आहे. त्यामुळे तिची ओळख मराठीमधील आयटम गर्ल अशी झाली आहे. मानसी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच बुधवारी (१९ जानेवारी) तिच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त तिने तिच्या लग्नातील एक व्हिडिओ शेअर करून तिच्या पाटील लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मानसीने (manasi naik) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तिने लग्नातील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्यातील लग्नातील काही विधी या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहात. पण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” तिच्या या व्हिडिओवर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. मानसी आणि प्रदीप ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. (manasi naik give best wishesh ti her husbund on their first wedding anniversary)

सोशल मीडियावर त्या दोघांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ नेहमीच व्हायरल होताना दिसत असतात. त्यातून त्यांची बॉंडिंग नेहमीच समोर येत असते. त्यांच्या जोडीला नेहमीच सगळे प्रेम दर्शवत असतात. लग्नाच्या वाढदिवसाच्या आदीच या जोडप्याने एकमेकांना गिफ्ट दिले आहे. त्या दोघांनीही हातावर टॅटू काढला आहे. याचा व्हिडिओ मानसीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता.

मानसी नाईकने मागच्या वर्षी १९ जानेवारी २०२१ रोजी तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तिचा पती प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तसेच तो एक अभिनेता आणि मॉडेल आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा