Tuesday, March 5, 2024

बाबो! ‘माझ्या 4 बायकांना मी ‘डंकी’ बघू देणार नाही’ म्हणताच फॅनवर संतापला शाहरूख; म्हणाला, ‘भाई तू..’

प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानला आज कोणत्याही ओळखेची गरज नाही. शाहरुख खानने त्याच्या अभिनयाच्या जोरावर खुप प्रसिद्ध मिळवली आहे. शाहरुख खानचे देशातच नव्हे तर परदेशात ही लाखो चाहते आहेत. शाहरुख खानने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. शाहरुखने आजवर अनेक सिनेमांमधून लोकांच्या मनावर राज्य केलं. शाहरुखचा आगामी ‘डंकी’ सिनेमा काहीच दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शाहरुखने नुकतंच त्याच्या फॅन्ससोबत #askSRK हे सेशन केलंय. त्यावेळी एका चाहत्याने शाहरुखला भन्नाट प्रश्न विचारला. त्यावेळी शाहरुखने त्या चाहत्याला दिलेलं उत्तर चांगलंच चर्चेत आहे. शाहरुख खानने नुकतंच ट्विटवर फॅन्ससोबत प्रश्न – उत्तरांचं #askSRK सेशन केलं. एका फॅनने शाहरुखला सांगितलं, “माझ्या 4 बायका, 24 मुलं आणि 50 शेजाऱ्यांना मी ‘डंकी’ पाहण्याची परवानगी देणार नाही. एवढं नुकसान मी सहन करु शकत नाही.”

यावर शाहरुखने रिप्लाय केला की, “भाई तू आधीच आयुष्यात इतका व्यस्त आहेस तर दुसरी कामं करायला तुला वेळ अजिबात मिळणार नाही. कृपया तुझ्या बायको – मुलांसोबत वेळ काढ. मुलांसोबत खेळ आणि बायकोसोबत सिनेमा पाहायला जा.” शाहरूखने दिलेला हा रिप्लाय सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 शाहरूख खानच्या कामाविषयी बोलायचं झालं तर,शाहरूख खानचा ‘डंकी’ 21 डिसेंबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू आणि विकी कौशल पहिल्यांदाच महत्त्वाच्या भूमिकेत एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रभासच्या ‘सालार’शी टक्कर देणार आहे. शाहरूख खानचा जवान आणि पठाण चांगलेच गाजले आहेत. शाहरूखच्या जवानने बाॅक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने अनेक रेकाॅड मोडले आहेत. (I will not let my 4 wives watch Dunky said Shahrukh who was angry with the fan)

आधिक वाचा-
‘अ‍ॅनिमल’च्या वादळात उडून गेला ‘सॅम बहादुर’, चांगले रिव्ह्यू मिळूनही केली फक्त ‘एवढी’ कमाई
ऑफ शोल्डर ड्रेसमधील सोनमचा झक्कास लूक; पाहा फोटो

हे देखील वाचा