Monday, March 4, 2024

शाहरुख खान आणि अनन्या पांडेवर गुन्हा दाखल? वाचा काय आहे कारण

यूट्यूबर एल्विश यादव सापाच्या विष प्रकरणात अडकल्यानंतर काही दिवसांनी, बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या हातात साप पकडून त्यांच्याशी खेळतानाचे फोटो समोर आले आहेत. बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि प्रसिद्ध अभिनेत्री चंकी पांडेची लेक अनन्या पांडे यांच्यावर वन्यजीव सुरक्षितता अधिनियमाखाली कारवाई होण्याची शक्यता आहे. एका कॉग्रेसच्या प्रवक्त्याने मुंबई पोलिसांना या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

18 नोव्हेंबर रोजी मुंबईतील बीकेसी येथे इशा अंबानीच्या मुलांच्या बर्थडे पार्टीत शाहरुख आणि अनन्या उपस्थित होते. या पार्टीत अनंत अंबानी यांनी शाहरुखला एक साप हातात दिला होता. शाहरुखने तो साप हातात घेत फोटोसाठी पोझ दिली होती. अनन्या पांडेने देखील एक सर्प हातात घेत फोटो शेयर केला होता.

या व्हिडिओ आणि फोटोंवर सोशल मीडियावर वाद निर्माण झाला होता. कॉग्रेसच्या प्रवक्त्या राकेश शेट्टी यांनी या दोघांच्या विरोधात वन्यजीव सुरक्षितता अधिनियम कायदा 2022 नुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. या कायद्यानुसार, वन्यजीवांना हानी पोहोचवणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, वन्यजीव सुरक्षा अधिनियमानुसार साप हे संरक्षित प्राणी आहेत. या प्राण्यांना हाताळण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. मात्र, शाहरुख आणि अनन्या यांनी परवानगीशिवाय साप हातात घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणात कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, शेट्टी यांनी केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे शाहरुख खान आणि अनन्या पांडे यांच्यावर टीका होऊ लागली आहे. (File a case against Shah Rukh Khan Ananya Pandey Congress spokesperson demands action)

आधिक वाचा-
काय होतं नेमकं ‘त्या’ लॉकेटमध्ये, बप्पी लहरींनी सांगितला रंजक किस्सा
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा2’साठी नवीन करार, चित्रपटात काम करण्यासाठी घेणार नाही मानधन, कमवणार कोट्यावधी रुपये

हे देखील वाचा