मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर वाद सुरु झाला आहे की, बॉलिवूडमधील कलाकारांनी तंबाखू, गुटखा आदी चुकीच्या गोष्टींची जाहिरात करणे योग्य की अयोग्य. बॉलिवूडमधील अनेक कलाकार जसे अजय देवगण, शाहरुख खान, अमिताभ बच्चन आदी अशा प्रकारच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे, किंवा काही करत आहे. याचा नेटकरी अतिशय खुलेपणाने विरोध करताना दिसत आहे. तर काही लोकांनी किंवा या कलाकारांच्या फॅन्सने त्यांना पाठिंबा करत या प्रकरणात त्यांचा बचाव केला आहे. हा वाद जसा वाढायला लागला तसे अक्षय कुमारने सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी देखील मागितली आहे. आता पुन्हा एकदा हे प्रकरण वाढणार असे दिसत आहे. करणं एका आयएएस ऑफिसरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत उभा कलाकारांकडे उत्तर मागितले आहे.
Kolkata Port Trust has said saliva laced with gutkha is corroding the iconic 70-year-old bridge. The Howrah Bridge is under attack from gutkha-chewers. @shahrukh_35 @akshaykumar @ajaydevgn @SrBachchan
Source: Google pic.twitter.com/sriVMIULig
— Awanish Sharan (@AwanishSharan) April 21, 2022
छत्तीसगढ कॅडरचे आयएएस अधिकारी असलेल्या अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून कोलकाता येथील प्रसिद्ध असणाऱ्या हावडा ब्रिजचा एक फोटो शेअर केला आहे. या ब्रिजचा एक पूर्ण पिलर तंबाखू आणि पानाच्या थुंकीमुळे रंगलेला दिसत आहे. अवनीश यांनी त्यांच्या ट्विटमध्ये या फोटोसोबत लिहिले, “कोलकाता पोर्ट ट्रस्टने सांगितले आहे की पान, गुटखा, तंबाखू आदींच्या थुंकीमुळे ७० वर्ष जुना प्रसिद्ध हावडा ब्रिज हळूहळू खराब होत आहे. असे पदार्थ खाणाऱ्या लोकांमुळे हावडा आब्रिज धोक्यात आहे.” अवनीश शरण यांनी त्यांचे हे ट्विट अक्षय कुमार, अजय देवगण, अमिताभ बच्चन याना टॅग देखील केले आहे.
तत्पूर्वी मागच्यावर्षी पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने तंबाखू, पान, गुटखा आदी अनेक गोष्टींवर बॅन लावला. मात्र तरीही लोकं याचा वापर करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










