Tuesday, June 18, 2024

‘तारक मेहता’ वयाच्या 42 व्या वर्षी पुन्हा अडकला लग्नबंधनात, इंटिरियर डिझायनर चांदनीसोबत थाटला संसार

‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ या शाेमध्ये तारकची भूमिका साकारणारा सचिन श्रॉफ वयाच्या 42 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकला आहे. अभिनेत्याच्या लग्नाचे फाेटाे साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहेत. या फाेटाेंमध्ये, अभिनेता नवरदेवाच्या लूकमध्ये खूप देखणा दिसत आहे. सचिन श्रॉफ यांनी इवेंट ऑर्गेनाइजर आणि इंटिरियर डिझायनर चांदनी कोठी हिच्यासाेबत लग्नगाठ बांधली. समोर आलेल्या फाेटाेंमध्ये, नवीन जोडपे खूपच सुंदर दिसत आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ आणि ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेची संपुर्ण कास्ट टीम सचिन श्रॉफ (sacchin shoff) याच्या लग्नात उपस्थित होते. लग्नाच्या विशेष प्रसंगी, सचिन श्रॉफने केशरी रंगाची शेरवानी परिधान केली होती, तर चांदनीने निळा रंगाचा भारी भरतकाम लेहेंगा घातला होता. यासाेबत तिने मॅचिंगऑरेंज रंगाचा स्कार्फ घातला आहे, जाे तिच्या साैंदर्यात भर घातल हाेता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सचिन श्रॉफच्या लग्नात तारक मेहेताची टीममधून जेनिफर मिस्त्री, अंबिका रंजंकर आणि सचिनची रील पत्नी सुनना फौजदार, पलक सिंधवानी, कुश शाह, तनवी ठक्कर, यश पंडित, स्नेहा भवन, किशोर शाणे, शीतल मौलि, मुनमुन दत्ता, आणि नीतीश भलूनीही सामील हाेते.

दाेघांच्या लग्नापूर्वी झालेल्या कॉकटेल पार्टीचेही फाेटाे समाेर आले आहेत. कॉललेट पार्टीबद्दल बाेलायचे झाले, तर यावेळी चांदनीने आइवरी गाऊन परिधान केला हाेता, तर सचिन काळ्या सूट-बूटमध्ये देखणा दिसत होता. मात्र, सचिन श्रॉफचे हे दुसरे लग्न आहे. चांदनीआधी सचिन श्रॉफने जुही परमारशी लग्न केले हाेते. मात्र, लग्नाच्या 9 वर्षानंतर म्हणजेच सन 2018 मध्ये अभिनेत्याने तिच्यासाेबत घटस्फाेट घेतला.(television actor sacchin shoff tied knot with chandani see taarak mehta ka ooltah chashmah actor wedding photos)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॅक टू बॅक फ्लाॅप चित्रपटांवर अखेर अक्षय कुमारने साेडले माैन; म्हणाला, ‘ही माझी चूक…’

शहनाज गिलविरोधात ट्विट केल्याने ट्रोल झाली सोना महापात्रा; चाहते म्हणाले, ‘फुटेज हवे असेल तर…’

हे देखील वाचा