Saturday, June 29, 2024

IIFA Awards | पती रोहनप्रीतसोबत दुबईला जात होती नेहा कक्कर, अचानक झाला अपघात

आयफा अवॉर्ड्स २०२२ साठी (IIFA Awards 2022) अनेक बॉलिवूड स्टार्स दुबईच्या यस आयलंडवर जाणार आहेत. या यादीत प्रसिद्ध गायिका नेहा कक्करच्या (Neha Kakkar) नावाचाही समावेश आहे. ती पती रोहनप्रीत सिंगसोबत (Rohanpreet Singh) दुबईला गेली आहे. मात्र, दुबईला रवाना होण्यापूर्वी त्यांच्यासमोर एक अपघात झाला, जो पाहून नेहा कक्कर चांगलीच घाबरली होती. मात्र, रोहनप्रीतने नेहाला सांभाळून घेतले. काही वेळाने दोघेही दुबईला रवाना झाले.

‘असा’ झाला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, नेहा कक्कर पती रोहनप्रीतसोबत दुबईला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचली होती. त्यादरम्यान अनेक फोटोग्राफर्स त्यांचे फोटो काढू लागले. अचानक एक फोटोग्राफर अडखळला आणि जमिनीवर पडला. हे पाहून नेहा कक्कर घाबरली. (iifa awards 2022 neha kakkar rohanpreet help photographer who falls down while taking their photos)

मदतीसाठी पुढे आली नेहा कक्कर 
फोटोग्राफर रस्त्यावर पडताच नेहा कक्कर त्याच्या मदतीसाठी पुढे आली. तिने आधी फोटोग्राफरला उचलले. मग विचारले, ‘बरा आहेस ना? डोक्याला मार लागला नाही ना?’ त्यानंतर नेहा आणि रोहनप्रीत दुबईला रवाना झाले. मात्र, यादरम्यान नेहा आणि रोहनप्रीत यांनी फोटोग्राफर्सना फोटो काढण्याची परवानगीही दिली.

२ जूनपासून सुरू होणार आयफा अवॉर्ड्स
आयफा अवॉर्ड्स २, ३ आणि ४ जून रोजी येस आयलंडवर होणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्स स्टेजवर धमाल करायला सज्ज झाले आहेत. ३ जून रोजी आयफा रॉक्स इव्हेंट होणार आहे, ज्याचे आयोजन अपारशक्ती खुरानासह (Aparshakti Khurrana) फराह खान (Farah Khan) करणार आहे. तनिष्क बागची (Tanishk Bagchi), देवी श्री प्रसाद (Devi Shri Prasad), हनी सिंग (Honey Singh), गुरु रंधावा (Guru Randhava), ध्वनी भानुशाली (Dhvani Bhanushali), नेहा कक्कर यांच्यासह असीस कौर (Asees Kaur) प्री-अवॉर्ड गालामध्ये परफॉर्म करणार आहेत. त्याच वेळी, मुख्य कार्यक्रम ४ जूनला होणार आहे. जो रितेश देशमुख (Retiesh Deshmukh) आणि मनीष पॉलसह (Manish Paul) सलमान खान (Salman Khan) होस्ट करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा