Friday, April 19, 2024

‘दिवसा पूजा केली जाते, तर रात्री महिलांवर…’, वादग्रस्त विधानानंतर कॉमेडियन वीर दासने दिले स्पष्टीकरण

अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास त्याच्या कॉमेडीपेक्षा त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे अधिक चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा भारतातील महिलांच्या स्थितीबाबत दिलेल्या वक्तव्यामुळे, तो अडचणीत आला आहे. वीर दासला त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. इतकेच नाही तर त्याच्यावर देशाचा अपमान केल्याचा आरोपही केला जात आहे. त्यानंतर आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिले आहे.

हे आहे संपूर्ण प्रकरण
वीर दास सध्या अमेरिकेत आहे. अलीकडेच त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘आय कम फ्रॉम टू इंडिया’ नावाचा व्हिडिओ अपलोड केला. हा व्हिडिओ जॉन एफ. केनेडी सेंटर, वॉशिंग्टन डीसी येथे त्याच्या लाईव्ह परफॉर्मन्सचा एक भाग होता. सहा मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये वीर दासने देशातील लोकांच्या दुहेरी चारित्र्याबद्दल सांगितले. ज्यामध्ये त्याने कोविड-१९ महामारी, बलात्काराच्या घटना आणि विनोदी कलाकारांवरील कारवाई ते शेतकरी प्रदर्शन यासारखे मुद्दे आपल्या कॉमेडीचा भाग बनवले आहेत. मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देशातील जनतेच्या भावना दुखावल्या. यामुळेच आता सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये
ट्विटरवर समोर आलेल्या वीर दासच्या या व्हिडिओचा एक भाग शेअर करून, युजर्स त्याला खरे खोटे सुनावत आहेत. या व्हिडिओ क्लिपमध्ये वीर दास असे म्हणताना ऐकू येतो की, “मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री बलात्कार केला जातो. मी भारतातून आलो आहे जिथे तुम्ही AQ1 9000 आहात, तरीही आम्ही आमच्या छतावर झोपतो आणि रात्री तारे मोजतो. मी भारतातून आलो आहे जिथे, आपण शाकाहारी असल्याचा अभिमान बाळगतो पण त्याच शेतकऱ्यांना त्रास देतो.”

कोमेडियनवर गुन्हा दाखल
वीर दासला आता अपमानास्पद शब्दांमुळे विरोध होत आहे. लोक त्याला ‘देशद्रोही’ म्हणत आहेत. एवढेच नाही तर भाजप कार्यकर्त्या प्रीती गांधी यांनीही हा व्हिडिओ शेअर करून आपला संताप व्यक्त केला आहे. देशाबद्दलचे हे विधान घृणास्पद आणि मूर्खपणाचे असल्याचे त्यांनी लिहिले आहे. या विधानाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आशुतोष जे दुबे यांनी कॉमेडियनविरोधात तक्रार दाखल केली, ज्याची एक प्रत त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहे.

वीर दासने दिले स्पष्टीकरण
त्याच्यावर होत असलेली कारवाई आणि लोकांच्या नाराजीला सामोरे जात असल्याचे पाहून वीर दासने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले आहे. देशाचा अपमान करण्याचा आपला हेतू नव्हता, अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. परंतु सर्व प्रकरणांनंतरही देश महान आहे याची आठवण करून देण्याचा त्याचा हेतू आहे, असे त्याने म्हटले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigg Boss 15: राकेश बापट गेल्यानंतर शमिता शेट्टीलाही काढावं लागलं बाहेर, पण का?

-ओढणीआड लपलेल्या नोरा फतेहीचा देसी लूक पाहून चाहते झाले वेडे, नेटकरी म्हणाले, ‘हाय गर्मी’

-ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे

हे देखील वाचा