Monday, May 27, 2024

वर्ल्डकपच्या माहोलमध्ये क्रिकेटप्रेमींनी ‘हे’ सिनेमे एकदा पाहाच; वाचा नावांची यादी

सिनेमा आणि क्रिकेटचे नाते खूप जुने आहे. हे जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे. क्रिकेटवर आधारित असे अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये बनले आहेत. क्रिकेटवर बनणाऱ्या चित्रपटांकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा असतात. मात्र, क्रिकेटवर बनलेल्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर एक-दोन चित्रपट सोडले तर बाकीचे चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरले आहेत. गेल्या काही वर्षांत क्रिकेटवर आधारित चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारच फ्लॉप होताना दिसत आहेत. या चित्रपटांमध्ये मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांचाही समावेश आहे, जे प्रेक्षकांच्या हृदयाला भिडण्यात अपयशी ठरले आहेत. चला तर मग जाणून घेऊया क्रिकेटवर बनलेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी केली आहे.

जर्सी
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा चित्रपट ‘जर्सी’ हा साऊथचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. साऊथचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘KGF Chapter 2’ सोबत रिलीज झाल्यामुळे चित्रपटाचे मोठे नुकसान झाले. चांगले रिव्ह्यू मिळूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरला. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 20 कोटींपर्यंत पोहोचू शकले नाही.

शाबाश मिट्ठू
भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज हिच्या जीवनावर आधारित ‘शाबाश मिठू’ हा चित्रपट 15 जुलै 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नूने मिताली राजची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 2.14 कोटींचा व्यवसाय केला.

83
रणवीर सिंगचा ’83’ हा चित्रपट 1983 मध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपवर आधारित आहे. या चित्रपटात कपिल देव यांचे जीवन अतिशय तपशीलवार दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात रणवीरने कपिल देव यांची भूमिका साकारली होती तर दीपिका त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. ’83’ हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 270 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आपले बजेटही पूर्ण करू शकला नाही. या चित्रपटाने केवळ 190 कोटींचा व्यवसाय केला.

अझहर
‘अझहर’ हा माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवर आधारित चित्रपट आहे, ज्यामध्ये इमरान हाश्मी आणि प्राची देसाई यांची जोडी दिसली होती. या चित्रपटात माजी क्रिकेटपटूच्या आयुष्याशी निगडित वाद मोठ्या तपशिलात दाखवण्यात आले होते. 2016 चा हा चित्रपटही फ्लॉप ठरला होता. या चित्रपटाला तयार करण्यासाठी सुमारे 38 कोटी रुपये खर्च आला होता पण त्याचे कलेक्शन केवळ 33 कोटींवर पोहोचले.

एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी
2016 मध्ये रिलीज झालेला दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. हा चित्रपट महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित असून माहीची भूमिका सुशांतने उत्कृष्टपणे साकारली आहे. हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याने 200 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. (In the mood of the World Cup cricket lovers must watch the jersey and MS Dhoni The Untold Story movie once)

आधिक वाचा-
तबस्सुम थाटात जगत होत्या आयुष्य, एवढ्या कोटींची संपत्ती ठेवली राखूण
जेष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांना ‘या’ कारणासाठी करावा लागला रिक्षेने प्रवास

हे देखील वाचा