Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड कोट्यवधी रुपयांचे मालक असूनही ‘या’ ५ अभिनेत्यांचे पाय मात्र जमिनीवरच, एक तर कमाईच्या ९० टक्के करतो दान

कोट्यवधी रुपयांचे मालक असूनही ‘या’ ५ अभिनेत्यांचे पाय मात्र जमिनीवरच, एक तर कमाईच्या ९० टक्के करतो दान

जगातल्या प्रत्येक माणसाला पैसा कमवायचा असतो आणि यश मिळवायचं असतं, आणि बघायला गेलं तर अशी इच्छा असणं काही वाईट नाही. पण माणसाची खरी गडबड तर तेव्हा होते, जेव्हा एखाद्या माणसाला यश मिळायला सुरुवात होते. कारण जास्तीत जास्त लोक थोडेसे यश प्राप्त झाले की, लगेच त्याचा दिखावा करायला लागतात. त्यांचे पाय जमिनीवर राहत नाही. त्याच्या राहणीमानात सोबत त्याच्या स्वभावात देखील बदल येतो, आणि आपण पैशाने किती बलवान आहोत हे ते सगळ्यांना दाखवत असतात. परंतु मित्रांनी जगात असे देखील काही लोक आहेत, ज्यांनी आयुष्यात बक्कळ पैसा कमावला आहे. तरी देखील त्यांचे पाय जमिनीवर आहेत. ते कधीही त्यांच्या जवळील पैशाचा आणि संपत्तीचा दिखावा करत नाही. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते लोक ज्यांनी आयुष्यात खूप यश आणि पैसा मिळवला आहे, पण त्यांनी कधीही त्या गोष्टीचा दिखावा केला नाही.

अक्षय कुमार
या यादीत पहिल्या स्थानी येतो तो बॉलिवूडमध्ये ‘खिलाडी’ या नावाने ओळखला जाणारा अक्षय कुमार होय. आज कोणत्याही ओळखीची गरज नाहीये. बॉलिवूड मधील यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत त्याची गणना होते. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या चित्रपटात काम केले आहे. त्याने अनेक पुरस्कार देखील त्याच्या नावी केले आहेत. अनेकांना हे माहीत नसेल की, अक्षय कुमार हा बॉलिवूड मधील सर्वात महागड्या अभिनेत्या पैकी एक आहे. आज त्याने आयुष्यात सगळे काही मिळवले आहे. परंतु तो कधीही तो गोष्टीचा दिखावा करत नाही. तो अगदी साधे पणाने त्याचे आयुष्य जगतो. त्याने कधीही त्याच्या यश ल डोक्यावर घेतले नाही. त्याने कमावलेल्या प्रत्येक गोष्टीची त्याला किंमत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

महेश बाबू
यादीतील पुढील नाव म्हणजे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार महेश बाबू. महेश बाबूचे आज जगभरात चाहते आहेत. मागील काही वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सिनेसृष्टीमध्ये जे काही स्थान. निर्माण केले आहे. त्यात महेश बाबू यांसारख्या कलाकारांचा मोलाचा वाटा आहे. त्याने आतापर्यंत २५ हून अधिक तमिळ चित्रपटात काम केले आहे. तरी देखील त्याने चित्रपटसृष्टीत खास स्थान निर्माण केले आहे. या एवढ्या चित्रपटातून त्याने खूप यश प्राप्त केले आहे. परंतु एवढे यश प्राप्त करूनही तो कधीही या गोष्टीचा दिखावा करत नाही. चित्रपटात स्टायलिश दिसणारा महेश बाबू त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच साधा आहे. त्यामुळेच त्याचे चाहते त्याच्याकडे जास्त आकर्षित होतात. या व्यतिरिक्त तो त्याच्या कमाईतील ३०% रक्कम तो दान करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

शाहरुख खान
बॉलिवूडमधील रोमान्स किंग आणि बादशाह अशी ज्याची ओळख आहे, तो किंग खान म्हणजेच शाहरुख खान हा बॉलिवूडमधील एक सुपरस्टार आहे. त्याने त्याच्या करीअरमध्ये अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. बॉलिवूडमध्ये येऊन आता जवळपास ३० वर्ष पूर्ण झाले आहेत. आज त्याचे चाहते केवळ भारतात नाही तर संपूर्ण जगभरात पसरले आहेत. आज त्याने त्याच्या आयुष्यात बक्कळ पैसा आणि प्रसिद्धी मिळवली आहे. तरी देखील त्याने या यशाची हवा त्याच्या डोक्यात जाऊ दिली नाही. तो त्याच्या आयुष्यात नेहमीच विनम्र राहील आहे. त्याची हिच गोष्ट त्याच्या चाहत्यांना जास्त भावते. त्याने त्याच्या आयुष्यात अनेकवेळा दान केले आहे.परंतु त्याने कधीही या गोष्टीचा गाजावाजा केला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

नाना पाटेकर
नाना पाटेकर हे बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी जर विचार केला तर आज ते एक लक्झरियस आयुष्य जगू शकतात. परंतु ते अगदी साधे आयुष्य जगतात. अनेकांना हे माहित नसेल की, आज एवढे श्रीमंत असूनही ते एका वन बीएचके फ्लॅटमध्ये राहतात. त्यांनी असे देखील सांगितले आहे की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रॉपर्टीमधील ९०% भाग गरिबांना दिला जाईल. यावरूनच त्यांच्या साधे पणाची ओळख पटते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nana patekar (@nana.patekar)

रजनीकांत
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ज्यांना अगदी देवाचे स्थान देऊन त्यांची पूजा केली जाते. ते म्हणजे थलायवा रजनीकांत. आजपर्यंत कोणत्याही अभिनेत्याला एवढा सन्मान मिळाला नाही. परंतु आज यशाच्या शिखरावर पोहचलेले रजनीकांत एवढे साधे आयुष्य जगतात की, कोणालाही त्यांचा हेवा वाटेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajinikanth (@rajinikanth)

ते अगदी हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आहेत. ते चित्रपटात येण्याआधी एक कंडक्टर होते. त्यामुळे आज त्यांनी एवढा पैसा कमवून देखील त्यांचे पाय जमिनीवरच आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘मोगॅम्बो खुश हुआ’, म्हणत पडद्यावर क्रूर खलनायक रंगवणारे अमरीश पुरी, सिनेमात येण्यापूर्वी राबले विमा कंपनीत
दत्त साहेबांचा विषय खोल! भारतात बनलेल्या ‘त्या’ सिनेमात होतं फक्त एकच पात्र, गिनीज बुकमध्येही नोंद
घाणेरडा शर्ट आणि फाटलेली जीन्स घालून रस्त्यावर सिगारेट विकणारा पोरगा कसा बनला सुपरस्टार?

हे देखील वाचा