Thursday, April 18, 2024

‘आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांच्या’ नामांकनामध्ये भारतीय कलाकारांना स्थान, नवाजुद्दीनला सर्वोत्कृष्ट…

पुरस्कार म्हणजे कलाकारांसाठी कौतुकाची आणि शाबासकीची थाप असते. पुरस्कार मिळाल्यानंतर कलाकारांनाही अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. आपल्या देशात अनेक पुरस्कार सोहळे संपन्न होतात. त्यात टेलिव्हिजन, नाटकं आणि सिनेमे अशा माध्यमांसाठी वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. मात्र जेव्हा आपल्या देशातील कलाकारांच्या कामाचे कौतुक अंतर्राष्ट्री पातळीवर केले जाते, तेव्हा त्याचा आनंद काही औरच असतो. कलाकारांसाठी आणि देशासाठी सुद्धा ही अभिमानस्पद बाब असते.

नुकताच टेलिव्हिजन आणि डिजिटल विश्वासाठी जगातील सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांच्या नामांकनांची घोषणा करण्यात आली आहे. या नामांकनामध्ये दोन भारतीय कलाकार आणि एका वेबसिरीजचा समावेश आहे. ७१ व्या एमी पुरस्काराचे विजेत्यांची यादी २२ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत.

या पुरस्कारांमध्ये सुश्मिता सेनच्या ‘आर्या’ या वेबसिरिजला बेस्ट ड्रामा सिरीजचे नामांकन मिळाले आहे. या वेबसिरीजच्या माध्यमातून सुश्मिताने तब्बल दहा वर्षांनी कमबॅक केले. सोबतच या वेबसेरिजमधून तिने डिजिटल माध्यमात पदार्पण देखील केले. सुश्मिताने स्वतः या नामांकनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

सुश्मितासोबतच नवाजुद्दीन सिद्धीकी आणि वीरदास यांना देखील नामांकन मिळाले आहे. नवाजुद्दीनला त्याच्या नेटाफिल्क्सवरील ‘सिरिअस मॅन’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ड्रामा या विभागात नामांकन मिळाले आहे. तर वीरदासला ‘नेटफ्लिक्स कॉमेडी स्पेशल वीरदास इंडिया’ साठी कॉमेडी विभागात नामांकन मिळाले आहे.

या नामांकनासह सोशल मीडियावर कलाकार, फॅन्स, नेटकऱ्यांनी या सर्वांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्री कंगना रानौतने देखील नवाजुद्दीनसाठी एक खास पोस्ट शेअर करत त्याचे अभिनंदन केले. कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “अभिनंदन सर, तुम्ही नक्कीच जगातील सर्वात्तम अभिनेत्यांपैकी एक आहात.” यासोबत नवाजुद्दीनने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहे. मागच्या वर्षी ‘दिल्ली क्राइम’या वेब सीरिजला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट वेब सीरिजचा सन्मान मिळाला होता.

 

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज

हे देखील वाचा