अक्षय कुमार, संजय दत्त, मानुषी छिल्लर, मानव वीज, सोनू सूद यांसारखी स्टार कास्ट असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट ३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि ऐतिहासिक चरित्रपट असलेला या सिनेमाने भारतात धूमाकूळ घालायला सुरुवातही केली. पण, हा सिनेमा भारताबाहेरील काही देशांमध्ये मात्र प्रदर्शित झालाच नाही. तसं भारतीय सिनेमांना भारताव्यतिरिक्त इतर देशातही मोठं मार्केट आहे. त्यामुळे अनेक चित्रपट परदेशातही मोठी कमाई करताना दिसतात. पण सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट हिंदू शासक पृथ्वीराज चौहान यांच्या शौर्यगाथेवर अवलंबून आहे. त्यात तराईनचे मोहम्मद घोरीबरोबर झालेले युद्ध अशा गोष्टी दाखवण्यात आल्यात, त्यामुळे ओमान, कुवेत, कतार अशा इस्लामिक देशांत या चित्रपटावर बंदी घातल्याचे समोर येत आहे. यामागे धार्मिकदृष्टीकोन कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. पण मित्रांनो सम्राट पृथ्वीराज असा काही एकमेव भारतीय सिनेमा नाही, ज्यावर परदेशात बंदी घातली गेली आहे. यापूर्वीही अनेक चित्रपट असे झालेत, ज्यावर बंदी आलेली आहे. कोणते आहेत ते चित्रपट चला जाणून घेऊ.
द काश्मिर फाईल्स
याचवर्षी काश्मिर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. कश्मिरी पंडीतांच्या लढाईबद्दल असलेला हा चित्रपट सिंगापूरच्या सेंसर बोर्डाने अनधिकृत म्हणून घोषित केला होता. इतकंच नाही तर अक्षय कुमारचाच बेल बॉटम हा २०२१ मध्ये आलेला चित्रपटही सौदी अरेबिया, कुवेत आणि कतार अशा देशांमध्ये प्रदर्शित झाला नव्हता. हा चित्रपट १९८० साली झालेल्या एअरलाईन हायजॅकच्या सत्य घटनेवर आधारीत होता. त्यामुळे इतिहासातील काही घटनांशी छेडछाड केल्याचा आरोप करत काही देशांनी या चित्रपटावर बंदी आणलेली. २०१८ साली सम्राट पृथ्वीराजप्रमाणेच पद्मावत हा ऐतिहासिक चिरित्रपट प्रदर्शित झाला होता, या चित्रपटाबद्दल अनेक वाद निर्माण झाले होते. अगदी सिनेमाचे नाव बदलण्यापासून ते कलाकारांना धमकीपर्यंत अनेक वाद झाले होते. पण अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि भारतात हिटही झाला. मात्र, रणवीर सिंग, दिपीका पदुकोण, शाहीद कपूर अशी स्टार कास्ट असलेला हा चित्रपट मलेशियामध्ये बॅन करण्यात आलेला, त्यामागे इस्लामिक संवेदनशीलता हे कारण असल्याचे सांगण्यात आलेले.
नीरजा
याशिवाय कुवेतमध्ये कुरूप चित्रपटात मर्डर थ्रिलर असल्याने बंदी होती, तर भारतात खूप जास्त कौतुक वाट्याला आलेला नीरजा हा सिनेमा पाकिस्तानमध्ये बॅन करण्यात आलेला. त्यामागे पाकिस्तानला निगेटीव्ह दृष्टीकोनातून दाखवण्यात आल्याचं सांगण्यात आले होते. पण अन्य देशांत या चित्रपटाला मोठे यश मिळाले. विद्या बालनच्या सर्वात हिट सिनेमांपैकी एक असलेला द डर्टी पिच्चर हा चित्रपट अनेक देशांमध्ये बॅन झाल्याचे विविध रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते. यामागे चित्रपटातील अनेक बोल्ड सीन कारणीभूत होते.
ओह माय गॉड
मित्रांनो परदेशात बॅन होणाऱ्या चित्रपटांमध्ये अक्षय कुमारच्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. त्याने मुख्य भूमिका साकारलेल्या ओह माय गॉड या चित्रपटावरही मध्य पूर्वकडील अनेक देशांमध्ये तसेच युएई, मलेशिया अशा देशांमध्ये बॅन लागलेला. धार्मिक संवेदनशीलतेच्या मुद्यावरून हा चित्रपट अनेक देशांत बॅन झालेला. २०१८ मध्ये आलेला पॅडमॅन हा सिनेमा अरुणाचलम मुरुगनंथम या व्यक्तिमत्वावर आधारित होता, जो त्याच्या पत्नीसाठी कमीतकमी पैशांमध्ये सॅनेटरी पॅड तयार करतो. मासिक पाळी आणि आरोग्यासंदर्भात जागृती करण्याबद्दल या चित्रपटाचे भारतात कौतुक झाले होते एवढेच नाही, तर ह्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गैरवण्यात आले होते. मात्र, विवादित कथेमुळे हा सिनेमा पाकिस्तानात बॅन झालेला.
बेबी आणि राझी
गुप्तहेर, दहशतवाद अशा विषयांशी निगडीत असणारे बेबी, राझी हे चित्रपटही पाकिस्तानध्ये बॅन झाले आहेत. पाकिस्तानची नकारात्मक प्रतिमा दाखवण्यात आल्याच्या कारणाने या चित्रपटांवर पाकिस्तानमध्ये बॅन लावण्यात आला. पण हे दोन्ही चित्रपट भारतात मात्र चांगलेच हिट झालेले. २०१६ साली आलेला उडता पंजाब, तेरे बिन लादेन हे चित्रपट देखील पाकिस्तानमध्ये बॅन झालेले आहेत, तर डेली बेली हा चित्रपट आधीच शिव्यांमुळे वादात अडकलेला. त्यात तो नेपाळमध्ये बॅन झालेला. इतकंच नाही तर १९९५ साली आलेला मनीषा कोइराला आणि अरविंद स्वामी यांचा बॉम्बे हा सिनेमा विवादित कथेमुळे सिंगापूरमध्ये बॅन झाला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही पाहा- ओमान आणि कुवेतने का घातलीये सम्राट पृथ्वीराजवर बंदी?
हेही वाचा-