Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी! ‘हे’ आहेत जूनमध्ये ओटीटीवर रिलीज होणारे सिनेमे अन् वेबसिरिज

घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी! ‘हे’ आहेत जूनमध्ये ओटीटीवर रिलीज होणारे सिनेमे अन् वेबसिरिज

घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी करायची म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म सर्वोत्तम पर्याय. आजपर्यंत अनेक भारी चित्रपट अन् वेबसिरिज ओटीटीवर तूम्ही पाहिले असतीलच, तर आता जून महिन्यातही ओटीटीवर रिलीज होणाऱ्या सिनेमा आणि वेबसिरिजची मोठी यादी आहे बरं का. त्यामुळे घरीच काय अगदी कुठेही मनोरंजन होणार हे फिक्सच, तर जून महिन्यात नक्की कोणते चित्रपट आणि वेबसिरिज तुम्ही ओटीटीवर पाहू शकता, हे या लेखातून जाणून घेऊया…

सर्वांना उत्सुकता आसलेला ‘आश्रम’ सिजन ३ ही वेबसीरिज येत्या ३ जूनला एमएक्स प्लेअरवर रिलीज झाली आहे. प्रकाश झा दिग्दर्शित या वेबसिरिजच्या पहिल्या दोन्ही सिजनला चांगला प्रतिसाद मिळाला, त्यातील बॉबी देओलने साकारलेली भगवान बाबा निरालाच्या भूमिकेचे खूप कौतुकही झाले. आता पुन्हा एकदा बाबा निराला सर्वांच्या भेटीला येणार आहे. यावेळी इशा गुप्ताही महत्त्वाच्या भूमीकेत दिसणार आहे. याशिवाय डिन्जी प्लस हॉटस्टारवरही अनेक वेबसिरिज आणि सिनेमा प्रदर्शित होणारेत. यातील बहुप्रतिक्षित असलेले मिस मार्वल, आशिकाना, ९ अवर्स या सिरिज आणि सिनेमांचा समावेश आहे. मिस मार्वल सिनेमा ८ जूनला रिलीज झाला असून यात इमान वेल्लानी मिस मार्वलच्या भूमिकेत आहे. फरहान अख्तरही या सिनेमात दिसणार आहे. तसेच आशिकाना ही वेबसिरिजही ६ जूनला डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाली आहे. ही वेबसिरिज रोमँटिक थ्रिलर ड्रामा असणार आहे. झैन आबाद खान आणि खूशी दुबे मुख्य भूमिकेत आहेत. हॉटस्टारवरच २ जूनला ९ अवर्स ही सिरिज रिलीज झाली असून यात ३ कैद्यांचा जेल तोडून बँक लुटण्याचा प्लॅन दाखवण्यात आला आहे.

हेही पाहा- जूनमध्ये ओटीटीवर धूमाकुळ घालण्यास सज्ज असलेले सिनेमे आणि वेबसिरिज 

फॉरेन्सिक, अर्ध, द ब्रोकन न्यूज सारख्या वेबसिरिज झी५ वर जूनमध्ये रिलीज झाल्यात. १० जूनला अर्ध हा सिनेमा रिलीज झाला असून यात ऍक्टिंगमध्ये करियर करण्यासाठी मुंबई आलेल्या जोडप्याची कहानी आहे. रुबिना दिलेक राजपाल यादव यांची मुख्य भूमिका असून राजपाल यादव ट्रान्सजेंडर बनलेलाही यात पाहायला मिळणार आहे. तसेच द ब्रोकन न्यूज ही सिरिज चर्चेत आहे कारण सोनाली बेंद्रे यातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करतेय. या सिरिजमध्ये पत्रकारितेच्या जगातील संघर्षाची कहानी दाखवण्यात येणार असून यात श्रिया पिळगावकर आणि जयदीप अहलावत हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही सिरिज १० जूनला रिलीज झाली आहे. याबरोबरच रहस्यमयी कथा असणारा फॉरेंन्सिक सिनेमा २४ जूनला रिलीज होत असून यात विक्रांत मेस्सी आणि राधिका आपटे मुख्य भूमिकेत असणार आहे.

बहुप्रतिक्षित रनवे ३४ हा सत्य घटनेवर अधारित चित्रपट २४ जून रोजी ऍमेझॉन प्राईमवर रिलीज होतोय. अमिताभ बच्चन, अजय देवगन, रकूल प्रीत सिंग यांसारखी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाने यापूर्वी मोठ्या पडद्यावर यश पाहिले आहे, आता हा चित्रपट ओटीटीवर धूमाकुळ घालण्यास सज्ज आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही अजय देवगनने केले आहे. नेटफ्लिक्सवर शी सिजन २ ही सिरीज १७ जूनला रिलीज होणार असून अदिती पोहनकर पोलिस कॉन्स्टेबलच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय वूट सिलेक्टवर कोड एम सिजन २ येत्या ९ जूनला रिलीज होणार असून जेनिफर विंगेट मुख्य भूमिकेत असून पहिल्या सिजनने अनेकांची मनं जिंकली आहेत त्यामुळे दुसऱ्या सिजनलाही मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा