यावर्षी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो ‘इंडियन आयडल १२’ हा खूप गाजला होता. हा शो पहिल्यांदाच १० महिने चालला आहे. या शोने एक विक्रम केला आहे. रविवारी (१५ ऑगस्ट) या शोचा ग्रँड फिनाले झाला. या शोचा विजेता पवनदीप राजन हा ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर अरुणिता, तर तिसऱ्या क्रमांकावर सायली कांबळे राहिली. या शोमधून सगळ्या कलाकारांचे करिअर घडले आहे. यात काही शंका नाही. यातच सायली कांबळे हिला एका चित्रपटात गाणे गाण्याची ऑफर आली आहे.
‘इंडियन आयडल’च्या या सीझनमध्ये सायली कांबळे हे नाव खूपच गाजले होते. याचसोबत तिचे आई- वडील देखील चांगलेच चर्चेत आले होते. तिचे गाणे देखील प्रेक्षकांना खूप आवडत होते. तिला यामधून खूप लोकप्रियता मिळाली आहे. अशातच सायलीच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. ते म्हणजे सायलीला एका चित्रपटात गाणे गाण्याची संधी मिळाली आहे. (indian ideol 3 rd winner sayli kamble get chance to sing marathi song)
मराठीमधील ‘कोल्हापूर डायरीज’ या चित्रपटासाठी सायलीने एक गाणे रेकॉर्ड केले आहे. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अवधूत गुप्तेने या चित्रपटाची गाणी कंपोज केली आहेत. ‘कोल्हापूर डायरीज’ हा चित्रपट मल्याळम ब्लॉकबस्टर चित्रपट ‘अन्गामाली डायरीज’चा रिमेक आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत भूषण पाटील आणि गायत्री दातार दिसणार आहेत. सायली कांबळेने या चित्रपटातील एक गाणे रेकॉर्ड केले आहे.
याबाबत संगीतकार आणि गायक अवधुत गुप्ते म्हणाला की, “आमचे दिग्दर्शक जो राजन यांना सायलीचा आवाज खूप आवडला होता. त्यांनीच मला या गाण्यासाठी सायलीचे नाव सुचवले होते. ती एक उत्कृष्ट गायिका आहे आणि हे तिने वेळोवेळी सिद्ध केले आहे. सायलीच्या रूपाने एक टॅलेंटेड गायिका महाष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला मिळाली आहे.”
'INDIAN IDOL' SINGER RECORDS SONG FOR FILM… #SayliKamble – second runner-up of #IndianIdol12 – recorded her first song for #Marathi film #KolhapurDairies… Composed by #AvadhootGupte… Directed by #JoeRajan… #KolhapurDairies is remake of #Malayalam film #AngamalyDairies. pic.twitter.com/7Bx91FXF9v
— taran adarsh (@taran_adarsh) August 17, 2021
‘कोल्हापूर डायरीज’ या चित्रपटातील हे रोमँटिक गाणे सायली कांबळे स्वप्नील बांदोडकर याच्यासोबत गायले आहे. हे गाणे लवकरच गायत्री दातार आणि भूषण पाटील यांच्यावर चित्रीकरण केले जाणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पवनदीपच्या बहिणीने केले अरुणितासोबतचे सुंदर फोटो शेअर; चाहते म्हणाले, ‘वहिनीला घरी घेऊन जावा’
-भारीच ना! स्वांतत्र्यदिनानिमित्त अभिनेत्री असिनने केला लाडक्या मुलीचा फोटो शेअर; एकदा पाहाच