‘इंडियन आयडल १२’मध्ये सायली कांबळेचे गाणे ऐकून हिमेश रेशमियाला अश्रू अनावर; म्हणाला, ‘…काळजाला भिडले’


टीव्हीवर अनेक शो आपल्याला पाहायला मिळतात. त्यात मग डान्सिंग शोपासून ते सिंगिंग शोपर्यंत सर्व शोचा समावेश होतो. यातील काही शो असे असतात, जे प्रेक्षकांचे लक्ष नेहमीच आपल्याकडे वेधून घेतात. आपल्या शोमध्ये विशेष पाहुण्यांना बोलावून ते शोची शोभा वाढवतात. असाच एक सिंगिंग रियॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल’ होय. इंडियन आयडलचे हे १२ वे पर्व सुरू आहे. या शोने आपला एक वेगळाच चाहतावर्ग तयार केला आहे. हा शो नेहमीच चर्चेत असतो. यावेळी या शोचे चर्चेत येण्यामागील कारण जरा वेगळे आहे.

यावेळी शोचे चर्चेत येण्याचे कारण आहे प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया. खरं तर शोमधील स्पर्धकाचे गाणे ऐकून हिमेशला अश्रू अनावर झाले. त्याने स्पर्धक सायली कांबळे हिची फक्त प्रशंसाच केली नाही, तर तिचे गाणे थेट काळजाला भि़डले, असेही त्याने म्हटले आहे. येत्या हिमेश रेशमिया स्पेशल एपिसोडचा प्रोमो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

सोनी टीव्हीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर येत्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये सायली कांबले सलमान खानचा चित्रपट ‘क्योंकि’मधील ‘क्योंकि इतना प्यार तुमको’ हिट गाणे गाताना दिसत आहे. तिचे गाणे ऐकून हिमेशला अश्रू अनावर होतात. दुसरीकडे, नेहा प्रसिद्ध गायिका नेहा कक्करची बहीण सोनू कक्कर आणि अनु मलिकही परफॉर्मन्स संपल्यानंतर उभे राहून टाळ्या वाजवू लागतात.

खरं तर हिमेश रेशमिया स्पेशल एपिसोडमध्ये हिमेशची गाणी ऐकायला मिळतील. तो स्वत: आपले ‘आपकी कशिश…’ हे गाणे गाताना दिसणार आहे. विशेष म्हणजे सलमान खानच्या ‘क्योंकि’ या चित्रपटाचा संगीत दिग्दर्शक हा हिमेश रेशमिया होता.

हिमेश रेशमियाने ‘बेखुदी’, ‘तेरी याद’, ‘अधुरी जिंदगी’, ‘आदत’, ‘आपकी कशिश’, ‘नाम है तेरा’, ‘हमको दीवाना’, ‘सारी सारी रात’ यांसारखी अनेक हिट गाणी गायली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये परदा हटा दो’ गाण्यावरील मानसी नाईकच्या एक्सप्रेशन्सवर तिचा पतीही झाला फिदा; कमेंट करत म्हणतोय, ‘ये चांद…’

-उर्वशीच्या पोटात एका व्यक्तीने दणादण मारल्या बुक्क्या; त्रास होत असूनही अभिनेत्रीने गपगुमान केले सहन

-जेनेलियासोबत रितेश करत होता रोमान्स; तिचा हात समजून केले ‘या’ दिग्दर्शकाच्या हातावर किस, पुढं काय झालं पाहाच…


Leave A Reply

Your email address will not be published.