किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमारने लावलेल्या ‘इंडियन आयडल १२’वरील आरोपांवर आदित्य नारायणचा पलटवार, म्हणाला…


सोनी टीव्हीचा प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल’मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी केलेल्या आरोपांवर आता यावर शोचा होस्ट आणि गायक आदित्य नारायणनेही पलटवार केला आहे.

स्पर्धकांचे गाणे अमित कुमार यांना फारसे आवडले नव्हते. ते म्हणाले होते की, “आजच्या पिढीला किशोर कुमार यांच्याविषयी काहीच माहिती नाही. त्यांच्यासारखे कोणीच गाऊ शकत नाही.”

पुढे बोलताना अमित यांनी म्हटले होते की, “मी तेच केले, जे मला करण्यास सांगितले होते. मला सांगण्यात आले होते की, सर्वांची प्रशंसा करायची आहे. कुणी कसेही गायले, तरीही त्यांची प्रशंसा करायची. कारण हे किशोर दा यांना ट्रिब्यूट दिले जात आहे. मला वाटले की, माझ्या वडिलांना श्रद्धांजली असेल. मी त्यांना आपल्या भागाची स्क्रिप्टही आधीच मागवली होती, परंतु असे काहीही झाले नाही.”

यावर आदित्य नारायणने म्हटले आहे की, “जर त्यांना काही तक्रार होती किंवा आवडले नव्हते, तर त्यांनी आधीच सांगायला हवे होते.” आदित्यला आश्चर्य आहे की, जर अमित कुमार यांना एखाद्या गोष्टीचा त्रास होत होता, तर त्यांनी एपिसोडच्या शूटिंगदरम्यान नाराजी का व्यक्त का नाही केली.

‘इंडियन आयडल १२’ ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. तथापि, शनिवार व रविवारच्या खास भागामुळे हा कार्यक्रम चर्चेत आहे. या विशेष भागातील कार्यक्रमात, दिवंगत गायक किशोर कुमार यांना श्रद्धांजली देण्यासाठी, किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा एक भाग झाल्यानंतर अमित कुमार यांनी शो संबंधित असे अनेक खुलासे केले, ज्याने प्रत्येकालाच धक्का बसला. ज्यानंतर शो ला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता या प्रकरणात आदित्य नारायण समोर आला आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, आदित्य नारायण म्हणाला की, “मी अमित जींचा खूप आदर करतो. केवळ एक- दोन तासांत दिग्गज गायकाला खरोखर श्रद्धांजली देणे सोपे नाही. पण आम्ही नेहमीच, आमच्याकडून चांगले देण्याचा प्रयत्न करतो. विशेषत: जेव्हा देशात अशी परिस्थिती आहे.”

आदित्य नारायण पुढे म्हणाला की, “कोरोनाव्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे या टीममध्ये अत्यल्प स्त्रोत आणि कामगार आहेत. अशाप्रकारे, यातच कार्यक्रमाचे शूटिंग कसे सुरू आहे, हे कोणालाही माहित नाही. आम्ही कमी स्त्रोत आणि कामगार यांच्यात सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहोत.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मृत्यूचं सत्र सुरूच! तमिळ अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन, अवघ्या ४८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

-जेव्हा १६ वर्षीय जन्नत झुबेरच्या किसींग सीनवर भडकली होती आई, वडिलांनी दिली होती अशी प्रतिक्रिया

-‘तेव्हा खिसा रिकामा असायचा, पण…’, म्हणत कपिल शर्माने शेअर केला २३ वर्ष जुना फोटो, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ


Leave A Reply

Your email address will not be published.