‘जितकी जास्त चर्चा तितकी जास्त टीआरपी’ इंडियन आयडल वादात कुमार सानूंची उडी


टीव्ही इंडस्ट्रीमधला सर्वात मोठा, लोकप्रिय आणि प्रसिद्ध सिंगिंग रियॅलिटी शो म्हणून ‘इंडियन आयडल’ शो ओळखला जातो. या शोने संगीत क्षेत्राला अनेक मोठे आणि चांगले गायक दिले आहेत. गायनाच्या क्षेत्रात करियर करणाऱ्या नवोदित गायकांसाठी हा मंच म्हणजे एक सुवर्णसंधीच समजली जाते. स्पर्धकांना मोठमोठ्या लोकांचे मार्गदर्शन तर मिळतेच सोबतच जगभरात देखील मिळते. मात्र ह्या शोचे चालू पर्व मागील काही काळापासून सतत विवादांमध्ये अडकत आहे. शो वर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अनेक आरोप केले जात आहे.

नुकत्याच या शो मध्ये ९० च्या काळातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक कुमार सानू यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर सानू यांनी एका मोठ्या वृत्तपत्राला मुलाखत देताना एक वक्तव्य केले आहे. सानू यांच्या त्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा हा शो चर्चेत आला आहे. या मुलाखतीमध्ये कुमार सानू यांनी मनमोकळा संवाद साधला अनेक प्रश्नांना उत्तरे देखील दिली.

यावेळी सानू म्हणाले, “इंडियन आयडल हा शो प्रतिभावान कलाकारांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. चांगल्या गायकांना संगीतकारांनी संधी उपलब्ध देणे आवश्यक आहे, किंबहुना ती त्यांची जबाबदारी आहे. मागच्या काही काळात संगीत क्षेत्र खूप बदलले आहे. प्रोडक्शन, संगीत, गुणवत्ता, कलाकारांसोबतचे व्यवहार या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात.”

पुढे ते म्हणाले, ” जितके गॉसिप होईल तितकी टीआरपी वाढेल. ही काही मोठी गोष्ट नाहीये. प्रतिभा यशाचा मार्ग आपोआप शोधते आणि हे शो तुमच्यातल्या प्रतिभेला समोर आणतात. इंडियन आयडल सारखे शो तुमच्यातल्या टॅलेंटला सार्वजानिक व्यासपीठावर आणतात. कधी असे ही होऊ शकते की, या स्पर्धकांना इंडस्ट्रीमध्ये संधी मिळणार नाही, मात्र अशा मंचावर त्यांना काम आणि थोडे पैसे कमवायची संधी मिळू शकते.”

नुकत्याच प्रसारित झालेल्या इंडियन आयडलच्या फादर्स डे स्पेशल भागावर देखील टीका करण्यात आली आहे. या भागात गीतकार मनोज मुंतशिर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सर्व स्पर्धकांनी आपली गाणी वडिलांना समर्पित केली होती. पण हा भाग पाहिल्यानंतर अनेक युजर्सचे म्हणणे आहे की, मेकर्स ओरिजनल प्लॉट विसरून गेले असून, त्यांनी हा शो डेली सोप करून टाकला आहे. तसेच इंडियन आयडलवर शोमध्ये होणाऱ्या एलिमनेशवरुन देखील जोरदार टीका केली जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिव्यांका त्रिपाठीला आली होती ‘दया बेन’च्या रोलसाठी ऑफर? खरं काय ते घ्या जाणून

-‘मला जबरदस्तीने प्रेग्नंट करू नका, होईल तेव्हा पेढे वाटेल’, प्रेग्नंसीच्या वृत्तांवर पूनम पांडेने सोडले मौन

-‘किंग खान’च्या लाडकीने केला जिममधील मिरर सेल्फी शेअर; दिसतेय एकदम ‘फिट एँड फाईन!’


Leave A Reply

Your email address will not be published.