‘इंडियन आयडल १०’चा विजेता सलमान अलीचे ‘खुदा के बाद’ गाणे रिलीझ; चारच दिवसात झाले हिट


सध्या म्युझिक व्हिडिओ हे अनेक जुन्या- नव्या गायकांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. मागील अनेक काळापासून अनेक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय गायकांनी देखील त्यांचे म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित केले आहेत. अनेक लहान- मोठ्या गायकांना संगीत क्षेत्रात एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणून हे म्युझिक व्हिडिओ नावारूपाला येत आहे. या व्हिडिओंना मिळणारी लोकप्रियता देखील तुफान आहे.

या म्युझिक व्हिडिओच्या यादीत आता अजून एका व्हिडिओची भर पडली आहे. हा व्हिडिओ आहे ‘इंडियन आयडल’च्या दहाव्या पर्वाचा विजेता असणाऱ्या सलमान अलीचा. सलमानने नुकतेच त्याचे ‘खुदा के बाद’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. चार दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. केवळ चारच दिवसात या गाण्याला १३ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात भाविन भानुशाली, वैष्णवी राव, जो खान असून हे गाणे एलिगेंट आय प्रॉडक्शन एँड परफेक्ट टाईम पिक्चर यांनी तयार केले आहे.

या गाण्यात एक रोमॅंटिक आणि मनाला स्पर्श करणारी लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. या गाण्यात दाखवलेल्या स्टोरीमध्ये मुलीला मुलाबद्दल गैरसमज निर्माण होतो, आणि ती त्या मुलावर संशय घ्यायला सुरुवात करते. या संशयामध्ये ती त्या मुलावर हात देखील उचलते आणि त्या मुलापासून दूर होते. दोघेही वेगळे होतात आणि नंतर शांत, नाराज राहायला लागतात. एकमेकांसाठी ते अनेकदा तडपतात. वेगळे झाल्यानंतर अचानक एक घटना घडते आणि त्या मुलीला तिची चूक समजते आणि तिच्या कृतीवर तिला पश्चाताप होतो.

या गाण्याची अजून एक विशेष बाब म्हणजे गाण्याची शूटिंग झालेले लोकेशन. गाण्यात दिसणारे लोकेशन शांत आणि हिरवेगार आकर्षक दिसत आहे. कलाकारांच्या उत्तम कामाचे संपूर्ण श्रेय गाण्याच्या दिग्दर्शकांना शादाब सिद्दीकी यांना जाते. या गाण्याची निर्मिती अजय जैन आणि कुमार अभिषेक यांनी केली असून गाण्याला शब्दबद्ध आणि संगीतबद्ध अराफात महमूद, रोमी मुखर्जी यांनी केले आहे. दिग्दर्शक शादाब सिद्दीकी यांनी याआधी टी- सीरिज प्रॉडक्शन ‘पल पल’ या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. या गाण्याला ७० लाखांपेखा अधिक व्ह्यूज मिळाले असून गाण्यात एजाज खानने काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रिया वारियरचा देशात नाही तर परदेशात डंका! साडी नेसून रशियाच्या रस्त्यांवर केला भन्नाट डान्स

-‘सैंया झूठों का बड़ा सरताज निकला’ गाण्यावर थिरकली ऋचा चड्ढा; पब्लिक डिमांडवर शेअर केला व्हिडिओ

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Leave A Reply

Your email address will not be published.