Friday, March 29, 2024

व्हॅलेंटाईन डे स्पेशल…लग्नाला नाही म्हणाऱ्या देवेंद्रजींना अमृतांमध्ये ‘काजोल’चा भास होताच नकार बदलला होकारामध्ये

आज संपूर्ण जगात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जात आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात असलेले प्रेम व्यक्त करण्याचा आजचा दिवस. मात्र हे प्रेम फक्त आजच्या व्यक्त करावे का तर नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणताही दिवस चांगलाच असतो. प्रेम कधीही, कुठेही व्यक्त केले जाऊ शकते. मात्र तरीही आजच्या दिवसाला प्रेमवीरांच्या नजरेतून पाहिले तर महत्व आहे. आज आपण अनेक सेलिब्रिटी लोकांच्या गाजलेले प्रेमकहाण्या वाचल्या असतील मात्र आम्ही तुम्हाला आज अशी एक प्रेम कहाणी सांगणार आहोत जी अजूनपर्यंत जास्त लोकांना माहित नसेल. ही प्रेम कहाणी आहे महाराष्ट्र्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी गायिका अमृता फडणवीस यांची.  

आपल्याकडे असे म्हटले जाते की, नेहमीच एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. हे नक्कीच देवेंद्र जी आणि अमृता जी यांच्याकडे पाहून लक्षात येते. अमृता यांनी देवेंद्र यांना त्यांच्या कामात भक्कम साथ दिली आणि त्यांना यश मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. राजकारणातील अतिशय पक्के आणि कोणताही डाग नसलेले नेते म्हणून देवेंद्र जी यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या राजकारणाबद्दल राजकीय कारकिर्दीबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे, मात्र आज प्रेमदिनाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या वैयक्तिक आणि खासकरून त्यांच्या प्रेमाबद्दल सांगणार आहोत. देवेंद्र जी आणि अमृता यांची भेट कशी झाले?, लग्न कसे झाले? आदी सर्वच प्रश्नांबद्दल आज आम्ही माहिती देणार आहोत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

देवेंद्र फडणवीस आणि अमृता हे दोघेही मूळचे नागपूरचे. अमृता यांचे लग्नाआधीचे नाव अमृता शरद रानडे. त्यांच्या आई चारू आणि वडील शरद दोघेही नागपूरचे प्रसिद्ध डॉक्टर. त्यांची लाडकी लेक म्हणजे अमृता. अमृता यांचा जन्म १९७९ साली झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण नागपूरमध्ये घेतले आणि पुढे त्या पुण्यात गेल्या. तिथे त्यांनी सिंबायोसिस कॉलेजमधून एमबीए केले आणि त्या बँकेत नोकरीला लागल्या. त्यांना किंवा त्यांच्या घरच्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे साहजिकच त्यांचा राजकारणात तसा रस नव्हता.

इकडे देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. १९८९ मध्ये ते भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले. १९९७ साली नागपूर महानगरपालिकेचे देवेंद्र फडणवीस महापौर झाले. नागपूर महानगरपालिकेचे सर्वाधिक तरुण महापौर होते. सोबतच देशातील सर्वात तरूण महापौर म्हणूनही त्यांचा गौरव झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या देवेंद्रजीनी अविवाहित राहून संघाचे कार्य अविरत चालू ठेवण्याचे ठरवले होते. त्यांना लग्न करायचे नव्हते. मात्र त्यांचा हा निर्णय त्यांच्या आईंना मान्य नव्हता. आईच्या सांगण्यामुळे त्यांनी त्यांचा हा निर्णय बदलला आणि लग्नाला होकार दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

देवेंद्र यांनी होकार दिल्यानंतर त्यांच्यासाठी आईने वधू संशोधन सुरु केले. मात्र एकदा अचानक देवेंद्र यांच्या जवळच्या मित्राच्या घरी शैलेश जोगळेकर यांच्या घरी देवेंद्र आणि अमृता यांची पहिल्यांदा भेट झाली होती. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री होती काजोल. त्यांना अमृतामध्ये तिचा भास झाला. त्यांनी तसे अमृता यांना सांगितले देखील होते.

पुढे डिसेंबर २००५ मध्ये देवेंद्र आणि अमृता यांनी नागपूरच्या बोटॅनिकल गार्डन मध्ये लग्न केले. त्यांचा विवाह हा नागपूरमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. कारण त्यांनी त्यांच्या लग्नाला नागपूरमधील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या जवळपास ५०० लोकांना आमंत्रण दिले होते. पुढे देवेंद्र आणि अमृता यांना एक मुलगी झाली जिचे नाव त्यांनी दिविजा ठेवले आहे. अमृता या जरी बँकेत काम करत असल्या तरी त्यांना गायन आवडते. त्यांनी शास्त्रीय गायनाचे देखील धडे घेतले आहे. अमृता यांची आतापर्यंत अनेक गाणी आली आहेत. त्या बऱ्याचदा त्यांच्या गाण्यावरून ट्रोल होतात. अमृता या सध्या बँकिंग करियरसोबतच त्यांचे गाण्याचे करियर देखील उत्तम पद्धतीने सांभाळत आहे. तर देवेंद्र जी हे त्यांच्या राजकरणात व्यस्त आहेत. नोकरी, गाणे, घर हे सर्व अमृता उत्तम पद्धतीने सांभाळतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
किसी का भाई किसी की जान सिनेमातील ‘नय्यो लगदा’ गाणे प्रदर्शित, सलमान आणि पूजाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने वेधले लक्ष

पीएम माेदींनी साऊथ कलाकारांची घेतली भेट; म्हणाले, ‘महिलांच्या सहभागाला…’

हे देखील वाचा