पुरुषप्रधान भारतात महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. स्थानिक पातळीपासून ते देशाच्या राजकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचं दिसतंय. महिलामंडळीही स्वत:च निर्णय घेताना दिसतायत. असंच काहीसं बॉलिवूडच्या एका सिनेमावेळी घडलं होतं. आपण नेहमी ऐकत असतो. एखादा सुपरस्टार आपल्या सिनेमात कोणत्या अभिनेत्रीला कास्ट करायचं हे ठरवतो, पण जर हेच एखाद्या अभिनेत्रीनं केलं तर? होय, बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीनं सिनेमात कुणाला कास्ट करायचं हे ठरवलं होतं. ती अभिनेत्री इतर कुणी नाही, तर श्रीदेवी होती. चला तर जाणून घेऊया तो किस्सा…
श्रीदेवी (shridevi) म्हणजे 80 आणि 90 च्या दशकातली टॉपची अभिनेत्री. खरं तर श्रीदेवीनं हिंदीत येण्यापूर्वी साऊथच्या सिनेमात काम केलं होतं. तिनं 1978 ते 85 दरम्यान एन.टी.आर. कृष्णा गट्टमनेणी, विष्णूवर्धन यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत तेलुगू आणि कन्नड सिनेमात काम करत स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं. तिनं 1979 साली ‘सोलवा सावन’ सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. साऊथमध्ये हिट असलेल्या श्रीदेवीनं हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या नावाचा डंका वाजवला.
श्रीदेवीनं 1983 साली रजनीकांत यांच्यासोबत ‘अदुथा वरिसु’ या तमिळ सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी एकमेकांसोबत काम करणं बंद केलं होतं. कारण श्रीदेवी आता हिंदी सिनेमांमध्ये ऍक्टिव्ह झाली होती. मात्र, 1986 साली दोघांनीही पुन्हा एकदा ‘नान आदिमई इल्लाई’ या तमिळ सिनेमात काम केलं. हा सिनेमा तिने फक्त आणि फक्त रजनीकांत यांच्यामुळं केला होता. याच सिनेमाची परतफेड करण्यासाठी रजनीकांत यांनी 1989च्या ‘चालबाज’ या सिनेमात एक नॉन मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमात रजनीकांत यांनी चाळीत राहणारा एक बेवडा टॅक्सी ड्रायव्हर जग्गूची भूमिका साकारली होती. सिनेमातील दुसरा मुख्य अभिनेता होता सनी देओल. सनी पाजींनाही सिनेमात कास्ट करण्याची आयडिया श्रीदेवीचीच होती. श्रीदेवीती हिंदी सिनेमाच्या इतिहासातली पहिलीच अभिनेत्री होती, जी स्वत:च आपल्या सिनेमाचे हिरो निवडायची, पण सनी देओलला ही भूमिका करायचीच नव्हती. सिनेमाच्या सेटवर तो नेहमी विनोद करायचा की, त्याच्या भूमिकेचे क्रेडिट्समध्ये पाहुणे म्हणून वर्णन केले जावे. ज्या दिवशी सेटवर सनीचा क्लोजअप लागायचा, तेव्हा तो चटकन म्हणायचा, “आज माई नहीं आयी क्या?”
ज्यावेळी सनी देओलला विचारलं की, त्याने ‘चालबाज’ सिनेमात काम का केलं? त्यावर तो म्हणाला की, “सीता आणि गीता या सिनेमात वडिलांनीही अशीच भूमिका केली होती, त्यामुळेच मी ही भूमिका करण्यास होकार दिला होता. मला वाटलं की, सिनेमा आपल्याला यामुळे लक्षात राहील आणि बोनस म्हणजे या सिनेमात मला पंकज पराशर आणि श्रीदेवी सारख्या प्रतिभावान लोकांसोबत काम करण्याची संधी मिळत होती.”
‘चालबाज’ सिनेमा बनत होता. त्यावेळी रजनीकांतही दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतले सर्वात मोठे स्टार होते. आणि सनी देओल हा हिंदी सिनेसृष्टीतील स्टार होता. हे दोन्ही स्टार कलाकार असूनही, ‘चालबाज’ सिनेमाला श्रीदेवीचा सिनेमा म्हणून प्रमोट करण्यात आलं. आजही याला श्रीदेवीचा सिनेमाच म्हणलं जातं. सिनेमाच्या निर्मात्यांना असंही वाटतं की, श्रीदेवीने ‘चालबाज’मधल्या आपल्या अभिनयाने रजनीकांत आणि सनीच्या अभिनयालाही मागं टाकलं होतं. म्हणजेच काय तर तिच्याच अभिनयाला जास्त पसंती मिळाली. हे दोघे स्टार सिनेमात नसले, तरीही फारसा फरक पडला नसता. कारण जनता थिएटरमध्ये आली होती श्रीदेवीला पाहण्यासाठी.
श्रीदेवीसोबत काम करणाऱ्या सर्वांचा असा विश्वास आहे की, श्रीदेवी स्विच-ऑन-स्विच-ऑफ प्रक्रियेने काम करते. ती मेथड अभिनय करत नाही. ती एकप्रकारचे गिफ्टच आहे. ती खूप शांत, गुपचूप राहणारी होती महिला होती, पण कॅमेरा ऑन होताच श्रीदेवीचे स्विच ऑन व्हायचे. ती तडकाफडकी बदलायची. आणि जसा ‘कट’चा आवाज यायचा, तेव्हा ती स्विच ऑफ व्हायची.
तर अशाप्रकारे ‘चालबाज’ सिनेमात श्रीदेवीने सनी देओलला घेतले आणि रजनीकांत यांनीही काम केले. पण सिनेमा ओळखला जातो, तो श्रीदेवीमुळेच. रंजक माहिती अशी की, ‘चालबाज’ सिनेमातील ‘ना जाने कहा से आयी है’ या हिट गाण्याचं शूटिंग करत असताना, श्रीदेवीला 103 डिग्री ताप आला होता. तिच्या याच परफॉर्मन्सने तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. (interesting story about sridevi sunny deol and rajinikanth)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
रजनीकांत यांनी राज कुमारचे नाव ऐकल्यावर का दिला होता चित्रपटात काम करण्यास नकार, वाचा कारण
‘तो’ बॉलिवूड अभिनेता नसता, तर रजनीकांत यांनी कधीच हवेत फेकली नसती सिगारेट