Thursday, November 30, 2023

रजनीकांत यांनी राज कुमारचे नाव ऐकल्यावर का दिला होता चित्रपटात काम करण्यास नकार, वाचा कारण

बॉलिवूडमधील सुपरस्टार राजकुमार त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि दरारा ओळखला जातो. त्याचवेळी एकदा रजनीकांतने नाव ऐकून चित्रपटाची ऑफर नाकारली होती.चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय झाले होते.

राजकुमार (rajkumar) हे बॉलिवूडमधील त्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते, जो त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तसेच दमदार डायलॉग डीलिवरीसाठी ओळखला जात होते. त्याचवेळी, या सर्वांव्यतिरिक्त अभिनेता त्याच्या निर्भीडतेसाठी देखील खूप प्रसिद्ध होता. जेव्हा ते बोलायचे तेव्हा त्यांचा अंदाज फार निर्भीड असायचा. याच कारणामुळे इतर अनेक कलाकार त्याच्यासोबत काम करण्यास टाळाटाळ करत होते. त्याचवेळी एकेकाळी सुपरस्टार रजनीकांत (rajnikanth) यांनाही त्यांच्यासोबत चित्रपटाची ऑफर आली होती, पण राजकुमारचे नाव ऐकून त्यांनी चित्रपटाला नकार दिला.

रजनीकांत यांना हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता
१९९३ मध्ये मेहुल कुमारच्या दिग्दर्शनाखाली ‘तिरंगा’ चित्रपट आला होता. या चित्रपटात राजकुमार ब्रिगेडियर सूर्यदेव सिंह यांच्या भूमिका साकारताना दिसले होते, तर नाना पाटेकर (nana patekar) यांनी इन्स्पेक्टर शिवाजी राव यांची भूमिका साकारली होती. नाना पाटेकर यांच्या आधी सुपरस्टार रजनीकांत यांना इन्स्पेक्टर शिवाजीचे पात्राची ऑफर करण्यात आले होते.

राजकुमार यांच्यामुळे हा चित्रपट नाकारण्यात आला होता
या चित्रपटाचे दिग्दर्शक मेहुल कुमार Mehul Kumar यांनी त्यांच्या एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, जेव्हा त्यांनी रजनीकांतला शिवाजीची भूमिका ऑफर केली तेव्हा त्यांना हे पात्र खूप आवडले होते. मात्र, राजकुमारही या चित्रपटात असल्याचे कळताच त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला.
माध्यमांच्या वृत्तानुसार, रजनीकांत यांनी तिरंग्याची ऑफर नाकारताना दिग्दर्शकाला सांगितले की, जर राज साहेबांसोबत काही समस्या आल्या तर मी त्यांच्यासोबत कसे काम करू.

नसीरुद्दीन शाह यांना भूमिका ऑफर करण्यात आली होती
रजनीकांत यांच्यानंतर नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनाही ही व्यक्तिरेखा ऑफर करण्यात आली होती, परंतु त्यांनीही राजकुमारमुळे ते स्वीकारले नाही. त्यानंतर अखेर नाना पाटेकर या भूमिकामध्ये दिसले होते. (actor rajinikanth deny to work in film tiranaga after hearing raj kumar name)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
जरा इकडे पाहा! नव्या अन् सिद्धांत कारमध्ये दिसले एकत्र; नजर पडताच लाजली बिग बींची नात
यश ते रजनीकांत, साऊथचे ‘हे’ सुपरस्टार फाडफाड बोलतात हिंदी; बॉलिवूडकरांच्याही आहेत खूपच पुढे

हे देखील वाचा