Tuesday, June 6, 2023

प्रसिध्द अभिनेत्री ईशा अग्रवाल ‘झोलझाल’ चित्रपटातून झळकणार मराठी सिनेसृष्टीत

जॅकी श्रॉफ (jackie shroff) आणि संजय कपूर (sanjay kapoor)यांच्यासोबत हिंदी चित्रपट कहीं हैं मेरा प्यार आणि तमिळ मधील थित्तिवसल या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री ईशा अग्रवाल (isha agarval)आता आगामी झोलझाल मराठी चित्रपटाच्या मुख्य भुमिकेत झळकणार आहे.

’झोलझाल’ हा चित्रपट हास्याची मेजवानी घेऊन येत्या 1 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मल्टिस्टारर चित्रपटात अभिनेते मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव,(ajinkya dev) कुशल बद्रिके,(kushal badrike) भारत गणेशपुरे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, अंकुर वाळवे, अभिनेत्री प्रीतम कागणे, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक आणि अभिनेत्री ईशा अग्रवाल हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून निर्माता गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना अग्रवाल यांनी केली आहे. सहनिर्माते म्हणून रश्मी अग्रवाल आणि विनय अग्रवाल यांनी बाजू सांभाळली आहे.

ईशा अग्रवालचा जन्मः लातूर येथे झाला असून ईशाचे शालेय शिक्षण लातूर येथील कृपा सदन कॉन्व्हेंट स्कुल येथे झाले. पुढे चालून तिने सिम्बॉयसिस महाविद्यालय, पुणे येथून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तसेच तिने व्ही.एल.सी.सी. येथून न्यूट्रीशियन कोर्स पूर्ण केला.

ईशा अग्रवाल 2014 मध्ये पार पडलेल्या मिस एसआयसीसी पुणेची विजेती होती. तसेच मिस इंडिया एक्झीक्युइस्ट 2015 विजेती,मॉस्को, रशिया येथे पार पडलेल्या माईलस्टोन मिस ग्लोबल इंटरनॅशनल पॅजीएंट या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची विजेती, थायलंडमध्ये मध्ये झालेल्या माईलस्टोन मिस इंडिया इंटरनॅशनलची विजेती आणि ईशा अग्रवालने 2019 सालात मिस ब्यूटी टॉप आफ द वर्ल्ड हा किताब पटकावला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा