Monday, April 15, 2024

आनंदाची बातमी! टेलिव्हिजनवरील सुपरहिट मालिका इस प्यार को क्या नाम दूं फेम ‘हा’ अभिनेता झाला बाबा

टेलिव्हिजन विश्वातील सगळ्याचा ऑल टाइम फेव्हरेट शो म्हणजे ‘इस प्यार को क्या नाम दूं’ अभिनेत्री सनाया इराणी आणि अभिनेता बरुण सोबती यांचा हा शो तुफान गाजला २०१२ साली या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र आजही दहा वर्षांनी या शोची क्रेझ कायम आहे. आता असा अचानक हा शो चर्चेत येण्याचे एक मुख्य कारण आहे. या शोमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या बरुण सोबती विषयी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकताच बरुण दुसऱ्यांदा बाबा झाला आहे.

प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार बरुण सोबती आणि त्याची पत्नी असलेल्या पश्मीन मनचंदा हे पुन्हा आईबाबा झाले असून पश्मीनने एका मुलाला जन्म दिला आहे. याआधी त्यांना चार वर्षाची एक मुलगी असून आता ते एका मुलाचे आईबाबा झाले आहेत. मात्र अजूनपर्यंत त्यांनी या बातमीची सोशल मीडियावरून अधिकृत माहिती दिलेली नसली तरी एका मुलाखतीमध्ये त्याने तो बाबा झाला असल्याचे त्याने मान्य केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Barun Sobti (@barunsobti_says)

बरुण आणि पश्मीनने ते प्रेग्नेंट असल्याचे सांगितले नव्हते मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या अभिनेत्री दलजित कौरच्या लग्नाच्या वेळी ते उपस्थित होते. त्यानंतर लोकांच्या या प्रेग्नन्सीच्या लक्षात आले. बरुणने त्याची लहानपणाची मैत्रीण असलेल्या पश्मीनसोबत लग्न केले आहे. १२ डिसेंबर २०१० साली त्यांनी लग्न केले त्यानंतर २०१९ साली त्यांना एक मुलगी झाली आणि आता ते पुन्हा एका मुलाचे आईबाबा झाले आहे.

बरुण सोबतीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्याने ‘ इस प्यार को क्या नाम दूं’ या सुपरहिट मालिकेत काम केले होते. त्याने २००९ साली आलेल्या ‘श्रद्धा’ या मालिकेतून करियरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने ओटीटीवर ‘असुर’, ‘द ग्रेट इंडियन डिसफंक्शनल फैमिली’ आणि ‘तन्हाइयां’ अनेक सिरीजमध्ये काम केले असून, तो शेवटचा ‘जांबाज हिंदुस्तान के’मध्ये दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘खोटी कारणं नका देऊ’ रेस्टोरंटमध्ये ‘या’ कारणासाठी प्रवेश नकारल्यानंतर संतापलेल्या उर्फीने शेअर केली पोस्ट

प्रसिद्ध सेलिब्रिटी सारखे दिसण्याच्या नादान गमावला जीव, कॉस्मेटिक सर्जरीमुळे ‘या’ अभिनेत्याचा दुर्दैवी अंत

हे देखील वाचा