खरंच! जॅकलिन फर्नांडिस पडली प्रेमात? लवकरच ‘ड्रीममॅन’सोबत होणार नवीन घरात शिफ्ट


बॉलिवूडमधील कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक लहान- मोठ्या बाबी जाणून घेण्यामध्ये प्रेक्षकांना खूपच रस असतो. आपल्या आवडत्या कलाकारांचे वैयक्तिक जीवन जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडते. कलाकार देखील अनेकदा त्यांच्या खास आणि पर्सनल गोष्टी फॅन्ससाठी शेअर करतात. मात्र, असे असले तरी अनेक कलाकार असे देखील आहे, ज्यांना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल कुठेही बोलायला आवडत नाही. त्यांना त्यांचे जीवन सार्वजनिक न करता स्वतः पुरता आणि कुटुंबापुरताच मर्यादित ठेवायला आवडते. याच विभागात मोडणारी एक अभिनेत्री म्हणजे जॅकलिन फर्नांडिस.

‘श्रीलंकन ब्युटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॅकलिनने तिच्या सौंदर्याच्या आणि नृत्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक अपयश पचवत जॅकलिनने हे यशाचे शिखर गाठले आहे. अशा या सौंदर्यवतीचे जगभरात करोडो चाहते आहेत. तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असतात. मात्र, जॅकलिन कधीच तिचे वैयक्तिक जीवन उघड करत नाही.

मात्र, एक माध्यमातील वृत्तानुसार जॅकलिनच्या आयुष्यात तिच्या ड्रीम पार्टनरची एन्ट्री झाली आहे. जॅकलिनने याबद्दल अजून कुठेही वाच्यता केली नसली, तरीही सध्या जॅकलिन प्रेमात आहे हे नक्की. ती ज्या व्यक्तीसोबत सध्या आहे, तो अभिनय क्षेत्रातील नसल्याची माहिती मिळत आहे. तो एक उद्योजक असून मूळचा साऊथचा आहे. लवकरच हे दोघे एकत्र एकाच घरात शिफ्ट होत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जॅकलिन मागील काही काळापासून नवीन घराच्या शोधात होती.

जॅकलिन वांद्रे आणि जुहू या दरम्यान तिचे नवीन घर शोधत होती. आता तिला तिच्या मनासारखे घर मिळाले असून सध्या घराच्या इंटिरियरवर काम चालू आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर घराचे पेपरवर्क होईल आणि जॅकलिन आणि तिचा ‘ड्रीममॅन’ तिकडे शिफ्ट होतील. माध्यमांतील माहितीनुसार, जॅकलिन या रिलेशनशिपबाबत खूपच सिरीयस आहे. अनेकदा ते व्हिडिओ कॉलवर संवाद साधताना देखील दिसतात.

जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर नुकतेच तिचे बादशहा सोबतचे ‘पानी पानी’ गाणे प्रदर्शित झाले आहे. जॅकलिन आणि बादशहाचे हे ‘गेंदा फुल’ नंतरचे एकत्र दुसरे गाणे आहे. सध्या जॅकलिनच्या हातात अनेक सिनेमे आहे. यातले काही पूर्ण झाले असून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. यात ‘बच्चन पांडे’, ‘भूत पुलिस’, ‘अटॅक’, ‘सर्कस’, ‘राम सेतू’ आदी चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अभिनेत्याला जामीन अन् संताला जेल’, म्हणत पर्ल पुरीवर भडकले आसारामचे भक्त, सोशलवर मीडियाद्वारे राग व्यक्त

-सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन; रामायणात साकारली होती ‘आर्य सुमंत’ची भुमिका

-‘लगान’ला २० वर्ष पूर्ण; ‘लाल सिंह चड्ढा’च्या या हटके लुकमध्ये आमिर खानने मानले चाहत्यांचे आभार


Leave A Reply

Your email address will not be published.