Sunday, June 23, 2024

रजनीकांत यांच्या ‘Jailer’चा बॉक्स ऑफिसवर राडा, पहिल्या दिवशी छापले तब्बल ‘एवढे’ कोटी

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी बॉक्स ऑफिसवर दमदार पुनरागमन केले आहे. ‘थलायवा’ रजनीकांत यांचा ‘जेलर‘ हा सिनेमा गुरुवारी (दि. 10 ऑगस्ट) चित्रपटगृहात रिलीज झाला. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी या सिनेमाने बक्कल पैसा कमावला. रजनीकांत या सिनेमात पोलिसाच्या भूमिकेत आहेत. रजनीकांत यांनी पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याचा अंदाज आपण त्यांच्या जेलर सिनेमाची कमाई पाहून लावू शकतो. चला तर, पहिल्या दिवशी ‘जेलर’ बॉक्स ऑफिस कलेक्शन किती आहे पाहूयात…

रजनीकांत यांच्या ‘जेलर’ (Jailer) सिनेमाने जबरदस्त विक्रम केला आहे. त्यांचा हा सिनेमा 2023 या वर्षात ओपनिंग डे दिवशी सर्वाधिक कमाई करणारा तिसरा सिनेमा बनला आहे. Sacnilkच्या एका रिपोर्टनुसार, जेलर सिनेमाने भारतात तब्बल 44.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई सर्व भाषेत मिळून आहे. या कमाईमध्ये वीकेंडच्या दिवशी आणखी भर पडणार आहे. कदाचित त्यामुळे 100 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये पोहोचण्यास ‘जेलर’ सिनेमाला जास्त वेळ लागणार नाहीये. सिनेमाची ग्रॉस कमाई 52 कोटी रुपये आहे.

तमिळनाडूची सर्वात मोठी ओपनिंग
रिपोर्ट्सनुसार, जेलर सिनेमा तमिळनाडूत 2023मध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा बनला आहे. सिनेमाने या राज्यात तब्बल 23 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर दुसऱ्या स्थानी कर्नाटक असून तिथेही सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे. तिथे सिनेमाने 11 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच, केरळमध्ये 5 कोटी, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथे 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याव्यतिरिक्त इतर देशातून 3 कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

टॉप 3मध्ये मिळवली जागा
भारतीय बॉक्स ऑफिसवर 2023मध्ये आदिपुरुष सिनेमाने ओपनिंग डे दिवशी सर्वाधिक कमाई केली होती. या सिनेमाने 89 कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या ‘पठाण’ सिनेमाने 57 कोटी रुपये कमावले होते. आता 44 कोटींच्या ओपनिंग डे कलेक्शनसोबत ‘जेलर’ सिनेमा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या सिनेमाने नंदामुरी बालकृष्णा यांच्या वीरा सिम्हा रेड्डी (34 कोटी) सिनेमालाही मागे टाकले आहे.

शुक्रवारी रिलीज होणारे सिनेमे
विशेष म्हणजे, ‘गदर 2’ आणि ‘ओएमजी 2’ हे सिनेमे शुक्रवारी (दि. 11 ऑगस्ट) चित्रपटगृहात रिलीज होणार आहेत. या दोन्ही सिनेमांबाबत चाहते खूपच उत्सुक आहेत. या दोन्ही सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर होणार आहे. (thalaiva rajinikanth film jailer box office collection day 1 know here)

महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेची सुंदरी अशी झाली बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री, हॉलिवूड अभिनेत्री व्हायचे स्वप्न असलेल्या जॅकलिनचा सिनेप्रवास
‘देशाचा पंतप्रधान आला तरी सेल्फी देणार नाही…’, अभिनेता चिन्मय मांडलेकरने सांगितले कारण

हे देखील वाचा