Friday, April 19, 2024

मातृभूमीचा वाद! प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप; म्हणाले, ‘तुला भारतरत्न द्यायला पाहिजे…’

प्राजक्ता माळी (Prajkta Mali) ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्राजक्ता माळी आपल्या अभिनयाइतकीच सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या तिची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ज्यावर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या आगामी पोजेक्टसाठी लंडनमध्ये आहे. ती कामासोबतच लंडनमधील पर्यटनास्थळांचाही आनंद घेत आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र सध्या तिची लंडनमधील एक पोस्ट जोरदार चर्चेत आली आहे ज्यामुळे तिच्यावर नेटकरी चांगलेच भडकले आहेत. या पोस्टमध्ये प्राजक्ताच्या व्याकरणाच्या चुकांनी नेटकरी नाराज झाले आहेत.

प्राजक्ताने केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये असंख्य व्याकरणाच्या चुका आहेत. ज्यामध्ये तिने मातृभूमी शब्द मातृभी असा लिहला आहे तर लंडनमधील थेम्सनदीचा उल्लेख तिने थेंब्स असा केला आहे. तिच्या या व्याकरणाच्या चुका दाखवत नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केले आहे. या व्हायरल पोस्टमध्ये प्राजक्ताने लंडनमधील तिचे अनुभव मांडले आहेत. ज्यामध्ये तिने लंडनमध्ये करमत नसून आपला देशच बरा असे म्हणत तिची खंत व्यक्त केली आहे.

तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी ब्रिटीशांवर टिका करताना तिकडे तु जिन्स आणि टॉप हा भारतीय पेहराव घेतलास याचा अभिमान वाटतो. एखादी माठ बाई असती तर तिने ब्रिटीशांचा पेहराव म्हणजेच साडी घातली असती. तु जसे बोलतीस तशी वागतेस म्हणून तुला भारतरत्न द्यायला पाहिजे अशा शब्दात तिच्यावर ताशेरे ओढले आहेत.

काय आहे प्राजक्ताची व्हायरल पोस्ट-
भारताची आठवण येतेय असं म्हणणं चुकीचं राहिल.. आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरतो. एक क्षण देखील हिंदुस्तान माझ्या मनातून गेला नाही. इथं मन मूळीच रमलं नाही…त्याला अनेक कारणं आहेत..
१- ह्याच ब्रिटीशांनी आपल्याला फसवून १५० वर्ष आपल्यावर राज्य केलं. त्यांच्या भूमीत सुख कसं मिळावं?.
२- कोहिनूर परत देण्याचं काही नाव नाही. तो राग वेगळाच.
३- राणी गेल्यानं देश दुखवट्यात, ती मरगळ जाणवली.
४- इथल्या थंडीनं नुसतं गारठून नाही, जखडून गेल्यासारखं झालं.
५- कितीही सुंदर, स्वच्छ असला तरी इथे चैतन्य नाही हे पदोपदी जाणवलं.
६- संस्कृती, खाद्यसंस्कृती, जगण्याविषयीचं तत्वज्ञान अशा अनेक बाबतीत हे लोक विशेष माठ आहेत.. इथे रहात असताना त्याचे पडसाद आपल्यावर पडल्यावाचून राहत नाहीत. आणि ह्या माठांनी १५० वर्ष भारतात राहून आपली संस्कृती, शिक्षणपद्धती, पेहराव इ. गोष्टींवर ही माठगिरी बिंबवली. आणि वैषम्य असं की आपणही मेंदू न वापरता मोठ्या प्रमाणात ती आंधळेपणानं स्वीकारली. तो अनादर ठळक झाला.  दरम्यान प्राजक्ताची ही पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

हेही वाचा- ‘तो बकबास शो…’, ‘कॉफी विथ करण’वर संतापले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, ‘माझी सेक्स लाईफ…’
मराठी चित्रपटाचा अटकेपार झेंडा! ‘फोर्ब्स’ने घेतली ‘पल्याड’ चित्रपटाची दखल
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात बदनामी झाली, प्रतिमा सुधारण्यासाठी जॅकलीनने सुरु केली नवीन मोहिम

हे देखील वाचा