दाक्षिणात्य सुंदरीचा जलवा! बॉलिवूडच्या ‘धकधक गर्ल’नेही धरला गाण्यावर ठेका, व्हिडिओ व्हायरल

0
70
madhuri dixit and rashmika mandanna
photo courtesy ; instagram/colorstv

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘झलक दिख लाजा‘ हा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमातील प्रत्येकच भाग खूपच मनोरंजक आहे. या कार्यक्रमामध्ये दर आठवड्यामध्ये नवनवीन कलाकार येत असतात. यावेळी लाखो लोकांची क्रश रश्मिका मंदाना या कार्यक्रमात हजेरी लावताना दिसत आहे, माधुरी आणि रश्मिकाचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

‘झलक दिख लाजा'(Jhalak Dikhlaja) हा लोकप्रिय कार्यक्रम नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आसून या कार्यक्रम खूपच चर्चेत आला आहे. यातील प्रत्येकच सेलिब्रिटी आपल्या धमाकेदार डान्सने चाहत्यांचे मनं जिंकत आहेत आणि यांचे व्हिडिओदेखिल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच नोरा फतेही(Nora Fatehi)च्या लावणीने सोशल मीडियावर कहर केला होता, आणि आता पुन्हा एकदा या कार्यक्रमाचा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या ‘झलक दिख लाजा10’ च्या मंचावर पाहुनी म्हणुन रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna) हजेरी लावली आहे. रश्मिका आपल्या नवीन चित्रपट ‘गुडबाय'(Goodbye) च्या प्रमोशनसाठी आली आहे. तिच्या या चित्रपटामध्ये ती अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या मुलीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. रश्मिका ‘झलक दिख लाजा’ या कार्यक्रमात येऊन आपल्या धमाकेदार डान्सने धक धक गर्ल माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) लाही आपल्या तालावर नाचवले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

रश्मिका मंदानाचा(Rashmika Mandanna) ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘सामे सामे’ गाण्यावर अनेक लोकांसोबत कितीतरी सेलिब्रिटींनीही ठुमके लावले आहेत. आता ‘झलक दिख लाजा’च्या मंचावर रश्मिका म्हाणल्यावर आणि या गाण्यावर डान्स होणार नाही असे होईलका. सामे सामे गाण्याने रश्मिकासोबत माधुरी दीक्षितलाही डान्स करायला भाग पाडले. माधुरीही रश्मिकासोबत हुक स्टेप बरोबरीने करताना दिसून येत आहेत. या भागाचा प्रोमो कलर्स टीव्हीने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दोघींची चागलीच जुगलबंजदी दिसून येेत आहे. प्रेक्षकही यांच्या डान्सला खूपच पसंत करत आहेत. त्यासोबतच रश्मिकाने आपल्या करिअरबद्दल सांगताना म्हणते की, “मी माधुरी दीक्षितमुळेच आज अभिनेत्री बनू शकले आहे.” तिच्या या वक्तव्याने सगळ्यांचेच मन जिंकले आहे. पुढे सांगत की, “मी तुम्हालाच कॉपी करत होते, तुमच्या डान्सला कॉपी करत होते. मला असे वाटत आहे की, मी आज या मंचावर ऊभी आहे तर फक्त तुमच्यामुळे.” हे सगळं ऐकूण माधुरी दीक्षितही भावूक होते आणि रश्मिकाला मिठी मारते. या कार्यक्रमाचा हा प्रोमो शनिवार आणि रविवार दिवशी टेलिव्हिजनवर प्रदर्शित केला जाईल. मात्र, कलर्सचा टीव्हिचा हा प्रोमो व्हिडिओ पाहून चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे.चाहते आतुरतेने या भाराची वाट पाहात आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
‘तो बकबास शो…’, ‘कॉफी विथ करण’वर संतापले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, ‘माझी सेक्स लाईफ…’
मराठी चित्रपटाचा अटकेपार झेंडा! ‘फोर्ब्स’ने घेतली ‘पल्याड’ चित्रपटाची दखल
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात बदनामी झाली, प्रतिमा सुधारण्यासाठी जॅकलीनने सुरु केली नवीन मोहिम

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here