Latest Posts

बापलेकीचा धुमाकूळ! जॉनी अन् जेमीनं शिल्पा शेट्टीच्या गाण्यावर लावले ठुमके; चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस


सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार मंडळी चित्रपटांपासून दूर आहेत. मात्र, असे असूनही ते आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यापैकीच एक म्हणजे कॉमेडियन जॉनी लिव्हर होय. जॉनी यांच्यासोबतच त्यांची दोन्ही मुलं जेमी लिव्हर आणि जेस्सी लिव्हरही आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. विशेषत: जॉनी लिव्हरची मुलगी जेमी लिव्हर नेहमीच आपल्या वडिलांसोबतचे व्हिडिओ शेअर करताना दिसते. जॉनी आणि जेमीचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओलाही चाहत्यांकडून जोरदार पसंती मिळत आहे. या व्हिडिओतील बापलेकीच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

जेमी लिव्हरने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून वडील जॉनी लिव्हरसोबतचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. हे बापलेक शिल्पा शेट्टीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हंगामा २’ चित्रपटातील ‘चुरा के मेरा दिल २.०’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओत दोघेही हुक स्टेप्स करताना दिसत आहेत. व्हिडिओत जिथे जॉनी लिव्हरचा तोच जुना मस्तीने नटलेला अंदाज पाहायला मिळत आहे. त्याची मुलगी जेमीही सुंदर डान्स करत आहे. (Comedian Jamie And Johny Lever Dance Video Viral On Shilpa Shetty Chura Ke Dil Mera Song)

चाहत्यांच्या येतायत जोरदार प्रतिक्रिया
या व्हिडिओवर चाहत्यांकडून नेहमीप्रमाणेच जबरदस्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका युजरने लिहिले की, “कोणत्या वेळेला पोस्ट केले आहे?” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “भाई तुमचा डान्स तर कमाल आहे.” अशाप्रकारे कमेंट करत युजर्स जॉनी आणि जेमी या बापलेकीच्या डान्स व्हिडिओवर कमेंट करून कौतुक करत आहेत. यापूर्वीही त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

जेमीची कारकीर्द
जेमीने २०१२ मध्ये स्टँडअप कॉमेडियन म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. पुढे 2013 मध्ये जेमी ‘कॉमेडी सर्कस के महाबली’ या सोनी टीव्ही शोचा भाग राहिली आहे. यासह तिने अनेक शोही होस्ट केले आहेत. तिने बॉलिवूडमध्ये ‘किस किसको प्यार करू’ आणि ‘हाऊसफुल 4’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रिया वारियरचा देशात नाही तर परदेशात डंका! साडी नेसून रशियाच्या रस्त्यांवर केला भन्नाट डान्स

-‘सैंया झूठों का बड़ा सरताज निकला’ गाण्यावर थिरकली ऋचा चड्ढा; पब्लिक डिमांडवर शेअर केला व्हिडिओ

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss