‘आई नक्कीच खुश होईल’, म्हणत जेमी लिव्हरने केले लेहंग्यातील ग्लॅमरस फोटो शेअर


बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या मुलांनी आई- वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. आज ती मुलं आई- वडिलांपेक्षा जास्त लोकप्रिय आणि प्रसिद्ध असून, मोठा पडदा गाजवत आहेत. बॉलिवूड आणि घराणेशाही हा वाद कधीही न थांबणारा आहे. सेलिब्रिटींच्या मुलांना या क्षेत्रात कोणताही संघर्ष न करता एन्ट्री मिळते. यावरून नेहमीच टीका केली जाते. परंतु काही आहेत जे याला अपवाद आहेत. त्यामध्ये लोकप्रिय विनोदवीर अभिनेता जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी लिव्हर समावेश आहे.

प्रसिद्ध कॉमेडियन म्हणून आजच्या काळात जेमी लिव्हरचे नाव सर्वात आधी घेतले जाते. वडिलांप्रमाणेच जेमी एक उत्कृष्ट कॉमेडियन म्हणून नावारूपास आली आहे. जेमीने जॉनी लिव्हर यांची मुलगी ही ओळख मागे टाकत स्वतःची एक नवीन ओळख तयार केली आहे. जेमी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. तिचे फॅन फॉलोविंग देखील भरपूर आहे.

जेमीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, नेहमी दिसणाऱ्या जेमीपेक्षा या फोटोंमधील ती अधिक सुंदर आणि वेगळी दिसत आहे. नेहमी मेकअपशिवाय दिसणाऱ्या जेमीने यावेळेस तिचे ग्लॅमरस असे फोटो शेअर केले आहेत. गुलाबी रंगाच्या लेहंग्यामधील जेमीचे हे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. जेमीने हे फोटो पोस्ट करत लिहिले की, “कोणी नाही तर आई नक्कीच खुश होईल.” फॅन्स देखील जेमीची तिच्या या नवीन लुकबद्दल प्रशंसा करत आहे.

जेमी लिव्हरने २०१२ मध्ये लंडनमध्ये मार्केट रिसर्च एजन्सीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायला सुरुवात केली होती. पुढे तिने मुंबईतील ‘द कॉमिडी स्टोरी’मध्ये स्टँड अप कॉमेडियन म्हणून काम करायला सुरुवात केली. तिने काही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले असून, ‘किस किसको प्या करूं’ आणि ‘हाऊसफुल ४’ या सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

जेमी मिमिक्री करण्यात अतिशय हुशार असून, ती राणी मुखर्जी, सोनम कपूर, करीना कपूर, हेमा मालिनी यांची हुबेहुब नक्कल करते. मिमिक्रीसोबतच जेमी डान्समध्ये देखील माहीर आहे. अनेकदा ती तिचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी अभिनेत्रीची कोर्टात धाव

-‘हे मॉं, माताजी!,’ दयाबेनचा बोल्ड अवतार पाहून चाहते झाले हैराण; बॅकलेस ब्लाऊजमध्ये केला धमाकेदार डान्स

-व्वा! अभिनेत्री वनिता खरातने घेतली पहिली कार, फोटो शेअर करून लिहिले ‘स्वप्नपूर्ती’


Leave A Reply

Your email address will not be published.