जान्हवी कपूरने केले लेटेस्ट फोटो शेअर; पांढऱ्या रंगाच्या डेनिम शर्टमध्ये दिसला अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज


दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या स्टाईलमुळे सर्वत्र चर्चेत असते. तिचा ग्लॅमरस लूक नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. सोशल मीडियावर चाहतावर्ग देखील भरपूर असल्याने तिच्या फोटोला लाखोंमध्ये लाईक्स मिळत असतात. अशातच तिचे बीचवरील काही फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत. ती या फोटोमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. (Janhavi Kapoor’s new photo shoot viral on social media)

जान्हवी कपूरने तिचे हे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिचा लूक खूपच वेगळा आणि स्टायलिश दिसत आहे. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा डेनिमचा शर्ट घातला आहे. तिने अत्यंत लाईट मेकअप केला आहे, तसेच केस मोकळे सोडले आहेत.

तिचा हा वेगळा अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. या फोटोला आतापर्यंत ४ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच हा फोटो वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने 2018 मध्ये ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट ‘सैराट’ या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. ती लवकरच ‘गुड लक जॅरी’ या चित्रपटात दिसणार आहे. याव्यतिरिक्त ती करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत कार्तिक आर्यन दिसणार होता. पण त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. परंतु अजूनही त्याच्या जागी इतर कोणत्याही अभिनेत्याचे नाव समोर आले नाही. तसेच ती ‘तख्त’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. या आधी ती शेवटची ‘रूही’ या चित्रपटात दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.