आपल्याकडे सुरुवातीपासूनच हिंदी चित्रपट, हिंदी कलाकार आणि हिंदी गाण्यांनी सर्वांच्या मनावर राज्य केले आहे. कदाचित त्यामुळेच आपण कधी दुसऱ्या भाषा, दुसऱ्या भाषेतील गाणी याकडे लक्षच दिले नाही. मात्र, काळ बदलला आणि हळूहळू प्रादेशिक भाषांमधील गाणी लोकप्रिय व्हायला लागली. आज हिंदीसोबतच हरियाणवी, पंजाबी, भोजपुरी आदी अनेक भाषांमधील गाणी लोकप्रिय होत आहेत. या गाण्यासोबतच तिथे स्थानिक कलाकार देखील तुफान हिट हात आहे. यामध्ये सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. सोशल मीडियाने देखील या कलाकरांना प्रसिद्धी मिळवून देण्यात भूमिका बजावली आहे.
स्थानिक कलाकारांचे नाव घेतले की, सर्वात आधी डोक्यात नाव येते ते हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ सपना चौधरीचे. सपनाने तिच्या डान्सने फक्त हरियाणाच नाही, तर संपूर्ण देशात तिचे फॅन्स तयार केले आहेत. सपनाला नेहमीच तिच्या डान्सने सर्वांना वेड लावताना आपण पाहिले आहे. मात्र, सध्या काही काळापासून एक नाव सपना चौधरीच्या ठुमक्यांना तोडीस तोड देत आहे, आणि ते म्हणजे सुनीता बेबी होय. सुनीता बेबी मागील काही काळापासून चर्चेचा विषय ठरत असून, सोशल मीडियावर तर तिला दुसरी सपना चौधरी असे संबोधले जात आहे. काहींनी तर तिला सपनाची कॉपी करते असे देखील म्हटले आहे.
सोशल मीडियावर सुनीता बेबीच्या एक से बढकर एक व्हिडिओंनी आग लावली आहे. मात्र, यासर्वांमध्ये सुनीताचा एक डान्स व्हिडिओ जरा जास्तच लाईमलाईट्मध्ये आला आहे. या व्हिडिओमध्ये सुनीता ‘पतला दुपट्टा सरकाया ना करो’ या हरियाणवी गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाज देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तिचे फॉलोवर्स देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काळ्या रंगाचा ड्रेस घालून नाचणारी सुनीता सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. तिच्या या व्हिडिओला ११ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
सुनीता बेबीचे सर्वच व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंना लाखो लाईक्स येतात. यावरूनच आपल्या लक्षात येईल की, तिची लोकप्रियता किती आहे. मागच्या एक वर्षांपासून सुनीता चांगलीच प्रकाशझोतात आली आहे.
सुनीता फक्त हरियाणवी गाण्यांवरच डान्स करते असे बिल्कुल नाही तिचे हिंदी गाण्यांवरील डान्स देखील खूप लोकप्रिय होतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…