Wednesday, March 27, 2024

ठरलं तर! अभिनेता ह्रतिक रोशनची एक्स पत्नी दुसऱ्यांदा अडकणार विवाह बंधनात

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची (Hrithik Roshan) पुर्वाश्रमीची पत्नी सुजैन खान (Sussaine Khan) अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यापासून अर्सलान गोनीसोबतच्या तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल चांगलीच चर्चेत आहे. सुझान आणि अर्सलान अनेकदा एकमेकांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाले आहेत. नुकतेच हे जोडपे सुट्ट्याही साजरे करताना दिसले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. दरम्यान, आता या जोडप्याशी संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे. माध्यमांमधून समोर आलेल्या बातम्यांनुसार तर हृतिकची माजी पत्नी सुजैन खान लवकरच अर्सलान गोनीसोबत लग्न करू शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका सूत्राने खुलासा केला की, “सुझान आणि अर्सलान खूपच चांगले मित्र आहेत आणि त्यांना हे माहित आहे की त्यांना त्यांचे उर्वरित आयुष्य एकत्र घालवायचे आहे आणि म्हणूनच त्यांना लग्न करायचे आहे. आता यावर गांभीर्याने विचार करण्यात आला आहे.  त्यामुळे  या जोडप्याने लग्न केल्यास अतिशय साधेपणाने लग्न केले जाईल.कोणताही मोठा समारंभ आयोजित केला जाणार नाही. अशीही माहिती समोर आली आहे.

तत्पुर्वी, सुझान आणि अर्सलानच्या लग्नापूर्वी अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझाद यांच्या लग्नाचीही चर्चा जोरात होती. याबाबत एका सूत्राने मीडियाला सांगितले होते की, हृतिक रोशन लवकरच सबा आझादसोबत लग्न करण्याचा विचार करत आहे. मात्र, या जोडप्याने लग्न करायचे की नाही याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, सुझानबद्दल असे बोलले जात आहे की ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत नक्कीच लग्न करणार आहे, मात्र त्यांच्या लग्नाबद्दल अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची  पत्नी सुजैन खान यांनी 2000 साली एकमेकांसोबत लग्न केले होते. ह्रतिक आणि सुजैन मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. मात्र, दोघांचे हे नाते फार काळ टिकले नाही आणि 2013 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मात्र, वेगळे झाल्यानंतरही दोघेही आपली मुले रेहान आणि ह्रदान यांच्यासाठी एकत्र येताना दिसत असतात.

हेही वाचा –

“केजीएफ चित्रपट तुम्हाला कसा पाहू वाटला?” महेश मांजरेकर यांचा मराठी प्रेक्षकांना सवाल

आई बनल्यानंतर ‘अशी’ झालीये सलमानच्या अभिनेत्रीची तब्येत, जुना फिगर मिळवण्यासाठी जिममध्ये गाळतेय घाम

खालून लहान अन् वरून ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिशाने घेतली जोखीम, चाहत्यांच्या गर्दीत खाली बसून घेतला सेल्फी

हे देखील वाचा