आई बनल्यानंतर ‘अशी’ झालीये सलमानच्या अभिनेत्रीची तब्येत, जुना फिगर मिळवण्यासाठी जिममध्ये गाळतेय घाम

सन २०११ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बॉडीगार्ड’ सिनेमा आठवतो का? जर तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल, तर या सिनेमात अभिनेत्री करीना कपूर खान हिच्या मैत्रिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्रीही कदाचित तुम्हाला माहिती असेल. ती अभिनेत्री इतर कुणी नाही, तर हेजल कीच ही होती. हेजल खूपच कमी सिनेमात दिसली. तिने तिच्या कारकीर्दीत जेमतेम ५-६ सिनेमात काम केले. मात्र, तिला ‘बॉडीगार्ड’ या सिनेमातून ओळख मिळाली.

हेजल कीच (Hazel Keech) ही भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्याशी लग्न केल्यानंतर सिनेमापासून दूर गेली. तिने याच वर्षी मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे तिचे वजन वाढले आहे आणि ती पुन्हा तिचा पूर्वीचा फिगर मिळवण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहे. हेजलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती जिममध्ये वर्कआऊट (Hazel Keech Workout Video) करताना दिसत आहे.

हेजलचा व्हिडिओ व्हायरल
हेजल कीच हिने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “बाऊंस बॅक पोस्ट बेबी? नाही, मी माझी आ आंटे अमलापुरम बॉडी पुन्हा मिळवणार.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Hazel Keech Singh (@hazelkeechofficial)

या व्हिडिओत हेजल नारंगी रंगाच्या टी-शर्ट आणि काळ्या रंगाच्या पँटमध्ये दिसत आहे. या कपड्यांमध्ये ती बॉलचा व्यायाम करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला एक गाणेही वाजत आहे, जे २०१२ साली आलेल्या ‘मॅक्सिमम’ या सिनेमातील आहे. यामध्ये तिने ‘आ आंटे अमलापुरम’ गाण्यावर डान्स केला होता.

हेजल कीचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
हेजल कीच हिचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकरी तिच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. पती युवराज सिंग याने लिहिले आहे की, “यो हेजी, गो हेजी, हे तुला करायचं आहे.” तसेच, आमिर खान याची मुलगी आयरा खानने लिहिले की, “तुम्हाला हे करूनच दाखवायचं आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Hazel Keech Singh (@hazelkeechofficial)

युवराजसोबत अडकली लग्नबंधनात
हेजल कीच हिने युवराज सिंगसोबत सन २०१६ मध्ये लग्न केले होते. यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांनी मुलाला जन्म दिला होता. हेजल ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने अनेक सिनेमात काम केले आहे. ती सलमान खान याच्यासोबतही झळकली आहे. यासोबतच तिने आयराच्या ‘प्ले’मध्येही काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
खालून लहान अन् वरून ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिशाने घेतली जोखीम, चाहत्यांच्या गर्दीत खाली बसून घेतला सेल्फी
वयाच्या साठीत आमिरच्या बहिणीने ओलांडल्या मर्यादा, आई अन् पोरा-बाळांसमोरच पतीसोबत केले लिपलॉक
उर्फीने फक्त जीन्स घालून केले होते फोटोशूट, व्हायरल व्हिडिओत अभिनेत्रीने केसांनी झाकले शरीर