Monday, July 15, 2024

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आपल्या नावामुळे नाही, तर कामातून यशस्वी होण्यावर ठेवते विश्वास!

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिची मुलगी जान्हवी कपूर हिने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिच्या नवनवीन फोटोशूटने सतत चाहत्यांचे लक्ष वेधत असते. 25 वर्षाची जान्हवी आपल्या करिअर बातीत खूपच हुशार असून समजूतीच्या गोष्टी करत असते. प्रसिद्ध अभिनेची मुलगी असल्यामुळे तिला चित्रपटामध्ये सहजच काम मिळाले मात्र, ती याला आपली संधी मानून ती आता आपल्या कामातूनच ओळख निर्माण करण्यावर विश्वास ठेवत आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर (janhvi kapoor) हिने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये रिपोर्टरच्या प्रश्नाचे असे काही उत्तर दिले आहे की, सगळ्यांनाच एक अभिनेत्री म्हणून तिचा अभिमान वाटेल. जान्हवी आपल्या करिअरविषयी खूपच जिद्दीने काम करत असते. ती फक्त काम करायचे म्हणून काम करत नाही, तर त्यामुळे फक्त चित्रपट हिट होइल किंवा रिमेक बनवयाचा म्हणून बनवलाय, या गोष्टी तिला आवडत नाहीत. जान्हवीच्या मते, “चित्रपट भले रिमेक असेल, पण तो नवीन प्रकारे कसा दाखवता येइल हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे मला त्या प्रकारचे निर्माता आणि दिग्दर्शकासोबत काम करायला आवडेल.”

जन्हवीला यनंतर नेपोटिझमवर एक प्रश्न विचारला की, तुला श्रीदेवी आणि बोनीकपूरमुळे ओळखले जाते तर हीच ओळख तुला पुढे जाण्यासाठी फायद्याची ठरते का याच्यापेक्षाही तुला पुढे जायचे आहे? यावर जान्हवी खूपच समजदारीने उत्तर देत सांगते की, “मी पुढे येण्यासाठी तयार आहे, आणि मी किती पुढे आली आहे हे तुमच्यासारखे व्यक्तीच सांगू शकतात. मला माहित आहे की, मी श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी असल्यामुळे मला 1/2 चित्रपट मिळतील आणि मी त्यांच्यामुळेच पुढे आली आहे. काही लोकांना वाटत असेल की ही श्रीदेवीची मुलगी आहे त्यामुळे चित्रपट चांगला चालेल पण आता हे सगळे झाले आहे. आता मला लोक मला रोज बघतात मला माझ्या कामातून आपली ओळख निर्माण करायची आहे. मला माझे कौशल्या आणि मेहनत करुन चित्रपटामध्ये नाव कमवायचे आहे. त्यामुळे मला कोणताही भूमिका मिळाली तरी मी खूश आहे कारण मला माझ्यावर खूप विश्वास आहे.”

अभिनेत्रीच्या मेहनत करुनच यशस्वी होण्याचा मार्ग आहे. ती आपल्या बहिणालाही हिच शिकवण देत असते की, स्वत:वर विश्वास ठेव. कारण इथे सगळे लोक हेच म्हणताल का, यांना तर सगळं आयतं मिळालं आहे, पण एर गोष्ट ध्यानात ठेवायची की, आपल्याला मिळालेल्या गोष्टीसाठी सक्षम आहोत. अभिनेत्रीच्या अशा वक्तव्यामुळे तिच्या चाहत्यांना खूपच अभिमान वाटत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
बीग बॉसने दिलाओपन चॅलेंज! शिव ठाकरेची कॅप्टेन्सी हिसकावून अर्चना सांभाळणार घराची जबाबदारी…
एकेकाळी भीक मागत असलेले कादर खान बॉलिवूडमध्ये आले तरी कसे? वाचा ‘हा’ रंजक किस्सा

हे देखील वाचा