Sunday, July 14, 2024

बीग बॉसने दिलाओपन चॅलेंज! शिव ठाकरेची कॅप्टेन्सी हिसकावून अर्चना सांभाळणार घराची जबाबदारी…

लोक्रप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस16‘ प्रेक्षकांच्या भेटीली आला असून याच्या पहिल्याच दिवसापासून घरामध्ये अनेक वाद होताना दिसले. यानंतर या सिजनमध्ये असा एकही दिवस गेला नाही जे या स्पर्धकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले नसेल. बिग बॉसच्या प्रत्येकच भागामध्ये अनेक ट्वीस्ट पाहायला मिळाले त्यासोबतच काही नाते बनतानाही दिसले मात्र, त्यांनी त्यांच्या नात्याची कबूली दिली नाही. शुक्रवारी प्रसारित झालेल्या भागामध्ये खूपच रंजक गोष्टी ठरल्या आहेत आणि बिग बॉसनेही चांगलाच गेम केला आहे.

घराचा नवीन कॅप्टन शिव ठाकरे (Shiv Thakare) याने घरमाध्ये चांगलाच धींगाणा घातला. त्याच्या कॅप्टन बणल्यापासून अनेक सदस्य त्याच्या विरोधात उभे राहिले होते. मात्र, त्याने आपल्या अधिकाराचा फायदा घेत त्याने अर्चनाची झोप मोडण्याचा प्रयत्न केला हातो, पण अर्चनानेही माघार घेतली नाही. त्यामुळे प्रियंका देखिल अर्चनासोबत त्रासून गेली आणि मग दोघींनाही सगळ्यांना झोपून दिले नाही, आणि दुसऱ्या दिवशी अर्चनाने उशिरापर्यत झोपल्यामुळे अर्चनाने बिग बॉसचा नियम तोडला होता.

शिवने आपल्या कॅप्टनसीचा चुकीची फायदा घेत अर्चना आणि प्रियंकाला आपल्या निशाण्यावर धरले होते. त्यामुळे बिग बॉसने त्याला घराचा नियम तोडल्यामुळे कॅप्टनच्या पदावरुन हटवले आणि अर्चनाला कॅप्टन ठरवण्यात आले होते. त्यामुळे अर्चनाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र, बिग बॉसने अर्चनाला कॅप्टनचे पद एक प्रकारची शिक्षा म्हणूनच दिले होते. अर्चनाला अंदाजाच नव्हता की, ही एक शिक्षा आहे, पण घरातील बाकीच्या स्पर्धकांनी अर्चना कॅप्टन बनल्यामुळे तिची चांगलीच खिल्ली उडवली.

 

अर्चनाने घरातील सतत नियम तोडल्यामुळे तिला शिक्षा म्हणून घराची कॅप्टनचा अधिकार दिला आहे. बिग बॉसने हा आधिकार देत अकर्चनाला सांगितले की, तु नेहमी घरातील कॅप्टनमध्ये चुका काढत असते आणि त्यांना भांडत असतेस अशातच मी घरातील सगळ्यात सगळ्यात खोडकर मुलीला या घराची जबाबदारी देत आहे. अर्चनाला ही जबाबदारी एक ओपन चॅलेंज म्हणून दिली आहे. आता हे पाहणे खूपच महत्वाचे ठरेल की, अर्चना कशा प्रकारे जबाबदारी साभाळेल. याशिवाय पहालयला मिळत आहे की, ती कॅप्टन बनल्यापासून घरातील अनेक लोकांनी तिच्या विरोधात घरातील नियमांना तोडताना दिसले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
एकेकाळी भीक मागत असलेले कादर खान बॉलिवूडमध्ये आले तरी कसे? वाचा ‘हा’ रंजक किस्सा
महानायक अमिताभ बच्चन यांना ‘सर जी’ न म्हटल्यामुळे कादर खान यांना मिळाली होती शिक्षा, ऐका त्यांच्याच तोंडून

हे देखील वाचा