Saturday, June 29, 2024

कार्तिक आर्यन नाही, तर किस करण्यासाठी ‘या’ हँडसम अभिनेत्याचे घेतले जान्हवी कपूरने नाव

‘सैराट’ हा मराठी चित्रपट एवढा गाजला की, नंतर तो हिंदी भाषेत बनवण्यात आला. त्या चित्रपटाचे नाव आहे ‘धडक.’ या चित्रपटातून अभिनेत्री जान्हवी कपूरने दमदार पदार्पण केले होते. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला या चित्रपटासाठी संमिश्र प्रतिसादही समीक्षकांकडून मिळाला होता. पण ती आपली छाप सोडण्यात यशस्वी झाली होती. जान्हवी कपूरची तुलना नेहमीच तिची आई, आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी केली जाते. अशातच जान्हवी कपूरने  आता असा खुलासा केला आहे, ज्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

‘धडक’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केल्यानंतर, जान्हवीने ‘गुंजन सक्सेना’ आणि ‘रुही’ या चित्रपटातून आपल्या उत्तम अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. आश्यर्याची गोष्ट म्हणजे, जान्हवीने तिच्या आत्तापर्यंतच्या सर्व चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत. ती चित्रपट निर्मात्यांची आवडती होताना दिसत आहे.

जान्हवी कपूर काही काळापूर्वी, एका चॅट शोमध्ये पोहोचली होती. तिथे अभिनेत्रीने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बरेच सामंजस्यपणे दिले होते. पण यावेळी तिने एक धक्कादायक खुलासा देखील केला. या शो दरम्यान जेव्हा तिला विचारले गेले की, कोणत्या अभिनेत्याला किस करशील, तेव्हा तिच्या उत्तराने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते.

बातमीनुसार, विक्की कौशल या अभिनेत्याचे नाव जान्हवी कपूर हिने घेतले. अशावरून समजते की, जान्हवीला नक्कीच हँडसम हंक विक्की बरोबरही एखादा चित्रपट करण्याची इच्छा आहे. मात्र, अद्याप दोघांनी एकत्र कोणताही चित्रपट केलेला नाही. तरीही दोघांनी जाहरातीत एकत्र काम केले आहे. जान्हवीने धडकमध्ये ईशान खट्टरसोबत पदार्पण केला, तेव्हा त्यांच्या अफेअरची बातमी समोर आली. नंतर या बातमीत काहीच तथ्य नसल्याचे दिसून आले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून विकी कौशलचे नाव बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफशी जोडले गेले आहे. विक्की कौशल, आणि कॅटरिना कैफच्या डेटिंगच्या बातम्या बर्‍याच दिवसांपासून येत आहेत. हे दोघेही एकमेकांच्या घराबाहेरही पाहिले गेले आहेत. तरीही आता दोघांना एकत्र बघितले गेले नाही आहे. विकी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर, दुसर्‍याच दिवशी कॅटरिनालाही संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले होते, आता ते दोघे कोरोना मुक्त झाले आहेत. मात्र, अद्याप दोघांनीही या रिलेशनशिपच्या बातमीवर उघडपणे बोललेले नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जगावेगळं! बिझनेसमॅनच्या अंत्यसंस्कारात रडण्यासाठी चंकी पांडेंना मिळाली होती ५ लाखांची ऑफर, कारण वाचून बसेल शॉक

-चित्रपटांपासून दूर असलेली अभिनेत्री करतेय शेती, पाहा आंब्याच्या बागेतील जुही चावलाचे व्हायरल फोटो

-दिवंगत अभिनेता सुशांतच्या जीवनावरून शाळेतील मुलं शिकणार कुटुंबाचे महत्त्व, अभिनेत्याचा फोटोचा पुस्तकात समावेश

हे देखील वाचा