Sunday, December 15, 2024
[aioseo_breadcrumbs]

मुलाला जन्म देताना अशी झाली होती ‘या’ स्टारची हालत, शेअर केला डिलिव्हरी रूमचा व्हिडिओ

‘इश्कबाज’ फेम अभिनेता नकुल मेहता (Nakul Mehta) आणि पत्नी जानकी पारेख (Jankee Parekh) आजकाल त्यांचा मुलगा सूफीमध्ये व्यक्त झाले आहेत. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि स्वतःचे आणि त्यांच्या मुलाचे एकापेक्षा एक सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच आता जानकीने तिच्या प्रसूतीशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूप वेगाने व्हायरल होत आहे.

शेअर केला व्हिडिओ
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये जानकी तिच्या गर्भधारणेपासून ते डिलिव्हरीपर्यंतचा संपूर्ण प्रवास दाखवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जानकी पारेखने तिच्या डिलिव्हरी रूमची झलकही दाखवली आहे. यामध्ये बाळाच्या पहिल्या स्पर्शावेळी जानकी खूपच भावूक झालेली पाहायला मिळाली. (jankee parekh drops delivery room video actress delivery video wile giving baby birth)

दिले ‘असे’ कॅप्शन
हा व्हिडीओ शेअर करताना जानकी पारेखने एक गोंडस कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले की, “ज्या दिवशी मी तुला भेटले, माझे आयुष्य बदलले, तू मला ज्या पद्धतीने अनुभवतोस, ते सांगणे कठीण आहे. तू माझ्यातील एक खास व्यक्ती आहेस. असेच हसत राहा.”

सुफीचा जन्म
३ फेब्रुवारी २०२१ रोजी जानकीने सुफीला जन्म दिला. यानंतर, जानकी अनेकदा तिच्या प्रसूतीशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते, जे पाहून हे स्पष्ट होते की तिने तिची संपूर्ण सिझेरियन डिलीव्हरी कॅमेऱ्यात कैद केली आहे. यासोबतच यावेळी नकुलही त्याच्या पत्नीसोबत होता.

सांगितला डिलिव्हरीचा अनुभव
मुलाच्या जन्मानंतर सुमारे दोन महिन्यांनी जानकीने एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि शस्त्रक्रियेतून झालेल्या प्रसूतीचा अनुभव शेअर केला. जानकी आणि नुकल यांच्या मुलाचेही छोटे ऑपरेशन झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा