×

Indian Idol | मराठमोळी सायली कांबळे चढली बोहल्यावर, लग्नाचे फोटो आले समोर

‘इंडियन आयडल’ फेम सायली कांबळे (Sayali Kamble) विवाहबंधनात अडकली आहे. सायलीने तिचा प्रियकर धवल याच्याशी रविवारी (२४ एप्रिल) महाराष्ट्रीय रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले, ज्यामध्ये तिच्या कुटुंबियांव्यतिरिक्त जवळचे मित्रही उपस्थित होते. अशातच आता सायली आणि धवलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये दोघेही त्यांच्या लग्नाचे विधी पूर्ण करताना दिसत आहेत.

सायली आणि धवलने महाराष्ट्रीय रितीरिवाजांनुसार लग्न केले, त्यामुळे दोघेही महाराष्ट्रीयन लूकमध्ये जबरदस्त दिसत होते. वधूच्या वेशात सायली खूप सुंदर दिसत होती. गायिकेने लग्नात एक सुंदर पिवळी साडी नेसली, ज्याला लाल बॉर्डर आहे. यासोबत तिने जांभळ्या रंगाची शाल घेतली आहे. सोबत सायलीने सोन्याचे दागिने आणि हिरव्या बांगड्या घालून तिचा लूक पूर्ण केलेला पाहायला मिळाला. एकंदरीत सायली तिच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. त्याचवेळी तिचा वरही एखाद्या राजापेक्षा कमी दिसत नव्हता. क्रीम कुर्ता आणि जांभळ्या पायजमामध्ये धवल बराच देखणा दिसत होता. (singer sayli kamble ties the knot with boyfriend dhaval in a maharashtrian style)

सायली कांबळे आणि धवल यांचा विवाह कल्याणमध्ये त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवारात झाला. यापूर्वी सायलीने तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यामध्ये ती तिच्या हातावर मेहंदी लावताना दिसत होती. सायलीने मेहंदी समारंभासाठी हिरव्या रंगाचा शरारा परिधान केला होता, ज्यासह तिने खूप कमी मेकअप केला होती.

View this post on Instagram

A post shared by Sayli Kamble (@saylikamble_music)

दरम्यान सायली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यावरुन ती नेहमीच तिच्या चाहत्यांशी विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. याआधी डिसेंबर २०२१ मध्ये सायलीने धवलने तिला कसे प्रपोज या बद्दलची पोस्टही शेअर केली होती. या व्हायरल व्हिडिओमध्ये धवल तिला प्रपोज करताना दिसला होता. व्हिडीओ शेअर करताना सायलीने “सदैव माझ्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद . माझे प्रेम, माझा मित्र, माझा मार्गदर्शक आणि आता माझा जीवनसाथी माझे तुझ्यावर प्रेम आहे.” असा गोड कॅप्शन दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post