सायली कांबळेचं गाणं ऐकून गीतकार जावेद अख्तर भलतेच खुश; सांगितला ‘प्यार हुआ चुपके से’ गाण्याचा किस्सा


सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडल 12’ हा रियॅलिटी शो दर आठवड्याला प्रेक्षकांचे मन जिंकण्यास तयार असतो. हा आठवडा गीतकार जावेद अख्तर स्पेशल असणार आहे. ज्यामध्ये सगळे स्पर्धक त्यांनी लिहिलेल्या गाण्यांवर परफॉर्मन्स देणार आहेत. यातील स्पर्धक सायली कांबळेने ‘प्यार हुआ चुपके से’ हे गाणे गायले आहे. हे गाणे ऐकून जावेद अख्तर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत या गाण्याशी संबंधित एक किस्सा प्रेक्षकांना सांगितला. (Javed Akhtar impress sayali kamble’s performance)

सायलीने गायलेले गाणे सर्वांना खूप आवडले. जावेद अख्तर यांना देखील हे गाणे खूप आवडले. त्यावेळी सायलीचे कौतुक करताना ते म्हणाले की, “माझं शब्दाचं काम आहे पण कधी कधी अशी परिस्थिती येते की, मला शब्दच सुचत नाहीत. मी काय सांगू की, ही मुलगी किती सुरेख गाते. मी यावर काही बोलूच शकत नाही. तू खूप कमाल गायली.”

यानंतर जावेद अख्तर यांनी या गाण्याशी निगडित एक किस्सा सर्वांना सांगितला. जावेद अख्तर यांनी सांगितले की, “‘1942 ए लव्ह स्टोरी’ या चित्रपटात एकूण 6 गाणी होती. त्यातील तीन गाणी मी लिहिली होती. हे गाणे मी ट्यूनमध्ये लिहिले होते. जेव्हा पंचम दा यांनी मला ही ट्यून ऐकवली, तेव्हा त्यात कोणतेही शब्द नव्हते. जेव्हा मी ही ट्यून ऐकली तेव्हा मी विचार केला की, यात चुपके हा शब्द सामील होऊ शकतो. ट्यून ऐकल्यानंतर मी हा निर्णय घेतला की, यात चुपके हा शब्द बसू शकतो. मग मी विचार केला की, बाकीचे गाणे कसे लिहायचे.”

यासोबतच जावेद अख्तर यांनी सर्व स्पर्धकांच्या मैत्रीचे कौतुक केले. ते म्हणाले की, “ज्याप्रकारे हे लोक एकमेकांना साथ देत आहेत, ते कौतुकस्पद आहे. ते दुसऱ्या स्पर्धकांसाठी परफॉर्मन्स देतात.”

सायली कांबळेचे कौतुक करत परीक्षक सोनू कक्कर म्हणाली की, “सायली तुला आजपर्यंत कधीच जास्त वोट मिळाले नाहीत ना!! मी आज सर्वांना विनंती करते की, सायलीला भरभरून वोट करा. एकदा तरी तिला जास्त वोट मिळाले पाहिजे. त्यामुळे कृपया एकदा तिला वोट करा, ती हे सगळं डिझर्व करते.”

‘इंडियन आयडॉल 12’ हा शो अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोबाबत अनेक वेळा चुकीच्या बातम्या पसरल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्रीने घातला विचित्र ड्रेस; नेटकरी म्हणाले, ‘आज समजले आपल्या देशात…’

-‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने केला लॉस एंजेलिसमधील आलिशान घरासोबतचा झक्कास फोटो शेअर; किंमत वाचून येईल चक्कर

-अदा शर्माचे विचित्र अंदाजातील फोटो व्हायरल; विचारला असा प्रश्न की, नेटकरीही झाले हैराण


Leave A Reply

Your email address will not be published.