Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

जय आणि गायत्रीच्या मैत्रीत फूट? म्हणाला, ‘ते पण तुला बाजूलाच ठेवणार…’

‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये दिवसागणिक सदस्यांमधील नाती बदलत आहेत. जे सदस्य अगदी जिवाभावाचे मित्र वा जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या, त्यांच्यामध्ये दुरावा येत चालला आहे. मागील आठवड्यात विशाल आणि विकास, तसेच गायत्री आणि मीरामध्ये जोरदार भांडण झाले. त्यामुळे त्यांनी एकमेकांशी बोलणे सोडले. तसेच विशाल आणि सोनालीमध्ये देखील अबोला तसाच आहे. आणि आता कालपासून कुठेतरी जय आणि गायत्रीच्या मैत्रीत देखील फुट पडली असल्याचे, दिसून येत आहे.

जयने गायत्रीला नॉमिनेशनमध्ये देखील टाकले. गायत्रीला जयचे वागणे आणि जयला गायत्रीचे बोलणे, वागणे, इकडच्या गोष्टी तिकडे सांगणे हे पटत नाहीये. त्याचबाबतीत तो उत्कर्ष आणि मीराशी बोलताना दिसणार आहे.

जय, उत्कर्ष आणि मीरासोबत चर्चा करणार आहे. जयचे म्हणणे आहे की, “आपल्या गोष्टी तिकडे जातात किंवा आपण जी मेहनत करतो, जी गुंतवणूक करतो ती वाया जाते ना?” मीराचं म्हणणं आहे, “मागच्या वेळेस देखील तसंच झालं होतं.”

जय म्हणाला, “आपण मग कोणत्या वेगळ्या सदस्यामध्ये गुंतवणूक केली असते ना, तीच गोष्ट. आपल्याला रिझल्टनंतर चांगला मिळाला असता. विशालमध्ये गुंतवणूक केलं असतं. तो मजबूतीने उभा राहिला असता, दरगोष्टींमध्ये आपल्यासाठी. आपल्याला आज सपोर्टची गरज नाहीये, आपल्याला वोटची पण गरज नाहीये. उभं राहणं… काहीपण असून दे जेव्हा कोणी आपल्यासाठी उभं रहात ना आपली फॅमिली वाटते रे. मीराचे म्हणणे आहे, आपल्याला काही गरज नाहीये.”

“आज जर तू आमच्या विरुद्ध तिकडे गोष्टी बोललीस. तू आमच्याकडून शिकलेली आहेस, तू तिकडे ४० लोकांसमोर चूक काढते आहे. मग तू ते हत्यार म्हणून वापर करतेस. उद्या असं होईल, तेदेखील तुला नाही सांगणार गोष्ट. ते पण तुला बाजूलाचं ठेवणार. ज्यावेळेस गरज आहे, तेव्हा हिला वापरा,” असंही जय पुढे बोलताना म्हणाला.

आता ही चर्चा पुढे किती वाढत जाते, हे पाहणं उत्सुकतेचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बाबांची आठवण आणि संस्कारांची शिदोरी! तेजस्विनीने वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा

-गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लगीनगाठ, मोजक्या लोकांच्या उपस्थित केले लग्न

-‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगले ‘नॉकआउट’ नॉमिनेशन कार्य, कोण होणार या आठवड्यात नॉमिनेट?

हे देखील वाचा