Friday, April 18, 2025
Home अन्य Jaya bachchan : ‘नव्या संसदेतील शौचालयं इतकी घाणेरडी आहेत की…’, जया बच्चन यांची संसदेतील वॉशरुमबद्दल तक्रार

Jaya bachchan : ‘नव्या संसदेतील शौचालयं इतकी घाणेरडी आहेत की…’, जया बच्चन यांची संसदेतील वॉशरुमबद्दल तक्रार

संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवरून जोरदार चर्चा सुरु आहे. संसदेत निलंबन सत्र सुरूच आहे. कथित आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी लोकसभेतील आणखी 49 खासदारांवर निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे संसदेतील एकूण निलंबित खासदारांची संख्या 141 झाली. संसदेत खासदारांच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर संसदेतील वॉशरूम्सची अवस्था भीषण असल्याचा आरोप खासदारांनी केला आहे. समाजवादी पार्टीच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya bachchan ) यांनी संसदेतील वॉशरूम्सच्या वाईट स्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री जया बच्चन म्हणाल्या, “आमचे वॉशरुम्स खूप भयानक आहेत. त्यात पाणी नाही, स्वच्छता नाही. आम्हाला बोलण्याचा अधिकार नाकारला जात आहे. आम्हाला वॉशरुमला जाण्यासाठीही परवानगी दिली जात नाही.”

“आम्ही सकाळपासून बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. तुमच्यात किती संयम आहे ते बघू, असं सभागृह नेते आम्हाला म्हणाले. आज रात्री 11 वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज चालणार आहे. ते पाणी पितात आणि दर पाच मिनिटाला वॉशरुमला जाण्यासाठी ब्रेक घेतात. आमच्या वॉशरुम्सची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे”, अशी तक्रार त्यांनी केली.

कोणत्याही चर्चेशिवाय बिल पास करण्याच्या मुद्द्यावर त्या पुढे म्हणाल्या, “ते अयोग्य आणि चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. जर तुम्हाला बिल पास करायचे असतील तर मग थेट पास करा. होकार आणि नकार घेण्याचा अर्थ काय आहे? हा सगळा ड्रामा कशासाठी?” या प्रकरणावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “सदनातील गदारोळामुळे कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विरोधी पक्षाने सभागृहात शांतता राखली तर निलंबन मागे घेतले जाऊ शकते.”

जया बच्चन यांच्या विषयी बोलायचं झास तर, जया बच्चन एक भारतीय अभिनेत्री आणि राजकारणी आहेत. त्यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर खासदार म्हणून काम केले आहे. हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी ओळखली जाते.

आधिक वाचा-
श्रेयस तळपदेला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, पत्नी दीप्तीने व्यक्त केला आनंद, म्हणाली…
कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीच्या रोमँटिक सीनने वेधले लक्ष, ‘मेरी ख्रिसमस’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

हे देखील वाचा