Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड फोटो काढताच फोटोग्राफर्सवर भडकल्या जया बच्चन; नेटकरी म्हणाले, ‘भाजपला तर तुमचा श्राप…’

फोटो काढताच फोटोग्राफर्सवर भडकल्या जया बच्चन; नेटकरी म्हणाले, ‘भाजपला तर तुमचा श्राप…’

बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) नेहमीच त्यांच्या कडक स्वभावामुळे चर्चेत असतात. कधी संसदेत, तर कधी मीडियासमोर त्यांचा राग नेहमीच दिसून येत असतो. विशेष म्हणजे त्यांना फोटो काढणे आवडत नाही त्यामुळेही त्या अनेकदा कॅमेऱ्यावाल्यांवर चिडताना दिसून येतात. नुकताच त्यांचा असाच रुद्रावतार समोर आला असून, एका कॅमेरामॅनवर त्या संतापलेल्या दिसत आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. काय आहे हे सगळे प्रकरण चला जाणून घेऊ. 

गुरूवारी (१७ मार्च) जया बच्चन यांच्या मुलीचा म्हणजे श्वेता बच्चनचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सहभागी होण्यासाठी जया बच्चन आल्या होत्या. यावेळी कारमध्ये बसलेल्या जया बच्चन यांचे फोटो टिपण्यासाठी माध्यमांनी आणि कॅमेरावाल्यांनी गर्दी केली होती. यावेळी जया बच्चन चांगल्याच चिडलेल्या दिसून आल्या. कॅमेऱ्याची फ्लॅश त्यांच्या डोळ्यावर पडताच त्यांचा राग अनावर झाला. त्यामुळेच त्या रागावलेल्या दिसून आल्या. या व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांनी फोटो काढणाऱ्याला “काय आहे?” असे म्हणत खडसावल्याचे दिसत आहे.

जया बच्चन यांचा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत असून, यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर एका नेटकऱ्याने जया बच्चन यांच्यावर निशाणा साधताना “ही बाई नेहमीच रागात असते” असे म्हटले आहे. तर आणखी एकाने “काय माहित अमिताभ हिला कसे सहन करतात?” अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेकांनी “मॅडम हा शाप भाजपा वाल्यांना तर लागला नाही ना?” असे म्हणत जया बच्चन यांची खिल्ली उडवली आहे.

सध्या त्यांच्या या व्हायरल व्हिडिओवर अनेक चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.  दरम्यान जया बच्चन यांच्या या रागीट आणि फटकळ स्वभावाबद्दल श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आईला गर्दी झालेली किंवा कुणी स्पर्श केलेला आवडत नसल्याचे कारण दिले होते. त्याचबरोबर त्यांना कॅमेऱ्याची फ्लॅश डोळ्यावर पडल्यानेही त्रास होत असल्याचे सांगितले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा