Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी त्यांचा ‘तो’ थ्रो बॅक फोटो पोस्ट करत शेअर केल्या पहिल्या शॉटच्या आठवणी

अभिनेत्री जया प्रदा यांनी त्यांचा ‘तो’ थ्रो बॅक फोटो पोस्ट करत शेअर केल्या पहिल्या शॉटच्या आठवणी

प्रत्येक कलाकारासाठी त्याचा शूटिंगचा पहिला दिवस आणि पहिला शॉट कायमच संस्मरणीय असतो. कारण तोच दिवस असतो, जेव्हापसून त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते आणि त्याला एक कलाकार एक अभिनेता म्हणून ओळख मिळत असते. त्यानंतर कलाकार अनके चित्रपटांचे शूटिंग करतात असंख्य शॉट देतात मात्र आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांना त्याच्या पहिल्या शॉटबद्दल विचारले तरी त्यांना अगदी कालच शॉट दिला एवढे लख्ख सर्व आठवत असते. आता बॉलिवूडमधील ८०/९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्री असलेल्या जया प्रदा यांनी देखील त्याच्या पहिल्या शॉटच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

सध्या घडीला बॉलिवूडपासून लांब राजकारणात सक्रिय असणाऱ्या जया प्रदा यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने एक काळ तुफान गाजवला. सध्या राजकारणामध्ये सक्रिय असणाऱ्या जया प्रदा यांनी सोशल मीडियावर त्यांच्या पहिल्या पहिल्या शॉटच्या आठवणी नेटकऱ्यांसोबत आणि त्यांच्या फॅन्ससोबत शेअर केल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो शेअर केला असून, सांगितले की वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला आणि पहिला शॉट दिला होता. जया प्रदा यांचा जुना फोटो पाहून आता त्यांचे फॅन्स तो फोटो कोणत्या सिनेमातला आहे याचा शोध घेत आहेत.

जया प्रदा यांनी शेअर केलेला त्यांचा जुना फोटो हा त्यांच्या ‘भूमि कोसम’ या सिनेमातील आहे. १९७४ साली आलेल्या या सिनेमाला केबी तिलक यांनी दिग्दर्शित केले होते. या सिनेमात अशोक कुमार, गुम्मडी, जगाया, जमुना, प्रभाकर रेड्डी आणि चलम हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. जया प्रदा यांनी त्यांचा जुना फोटो शेअर करत लिहिले, “थ्रोबैक फोटो…माझ्या पहिल्या सिनेमातील पहिला शॉट.” जया प्रदा यांचा हा फोटो पाहून त्यांचे फॅन्स त्यावर तुफान कमेंट्स करत त्यांचे कौतुक करत आहे. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडमध्ये एक अभिनेत्री म्हणून अमाप प्रसिद्धी मिळवणाऱ्या जया प्रदा यांचे खरे नाव ललिथा रानी असे होते. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये झाला होता. जया प्रदा यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर त्यांचे खरे नाव देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. बालकलाकार म्हणून जया प्रदा यांनी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी कमावली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा