बॉलिवूडमधील सर्वात टॉपच्या कॉमेडी कलाकारांचे नाव घ्यायचे म्हटल्यावर जॉनी लिवर आणि जेमी लिवर यांचे नाव या यादीत सर्वात वरच्या स्थानी येते. ते दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. जेमी देखील तिच्या विनोदी अभिनयाने सर्वांच्या मनात तिची जागा बनवत आहे. या बाप लेकीची जोडी सोशल मीडियावर त्यांचे विनोदी व्हिडिओ शेअर करून, नेटकऱ्यांचे मनोरंजन करत असतात. अशातच जेमी लिव्हर आणि तिचा भाऊ जेसी लिव्हर यांचा एक डान्स व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघे ‘जलेबी बेबी’ गाण्याच्या रिमेक व्हर्जनवर डान्स करताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, सुरुवातीला जेमी एकटीच कॅमेरासमोर डान्स करताना दिसत आहे. नंतर जेसी तिथे येतो आणि तो देखील तिच्यासोबत डान्स करायला लागतो. त्याच्या डान्स स्टेप्स देखील खूप आकर्षक आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये जेमीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे, तर जेसीने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे.
त्याच्या या व्हिडिओला अनेक युजर्स पसंती दर्शवत आहेत. त्यांचे अनेक चाहते त्यांच्या या फोटोवर कमेंट करून त्यांच्या डान्सचे कौतुक करत आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर सई लोकूर आणि राखी सावंत यांनी देखील कमेंट केली आहे. (Jemie lever and jessey lever’s dance video viral on social media)
जेमी लिव्हरने ‘किस किस को प्यार करू’, ‘हाऊसफुल’, ‘हाऊसफुल ४’, ‘राष्ट्रपुत्र’ या चित्रपटात काम केले आहे. सोशल मीडिया वर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नात नव्याचे काम पाहून पोटात मावत नाहीये ‘बिग बीं’चा आनंद; म्हणाले, ‘मला तुझा अभिमान आहे’
-राजेश्वरी खरातच्या बोल्डनेसने पाण्यातच लावली आग; ‘स्वीम सूट’मध्ये दिसली शालू
-धोनीसोबत फुटबॉल खेळायला पोहचला रणवीर सिंग; पाहायला मिळाली त्यांच्या बॉंडिंगची झलक