Thursday, April 25, 2024

Jersey | रिलीझ होताच वादात सापडला चित्रपट, शाहिद कपूरच्या ‘या’ कृत्यावर भडकले नेटकरी

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) पुन्हा एकदा त्याच्या ‘जर्सी’ या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आला आहे. हा चित्रपट शुक्रवारी (२२ एप्रिल) चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यापासूनच प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत होते. अशा परिस्थितीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षाला कितपत खरा ठरतो, हे नंतर कळेलच. मात्र रिलीझ होताच हा चित्रपट वादात सापडला आहे.

रिलीझपूर्वी हा चित्रपट कायदेशीर वादात अडकला होता, तर आता रिलीझनंतर शाहिदच्या चित्रपटाला सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. वास्तविक, चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) अभिनित चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी ट्विटरवर एवढी जोर धरू लागली आहे की, ट्विटरवर #BoycottJersey हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. (jersey boycott jersey trended on twitter on the very first day of release)

या चित्रपटाला विरोध करण्यामागचे कारण म्हणजे शाहिद कपूरने सुशांत सिंग राजपूतची (Sushant Singh Rajput) खिल्ली उडवणे. नेटकरी म्हणत आहेत की, शाहिद कपूरने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा आयफा अवॉर्ड्समध्ये अपमान केला होता. अशा अभिनेत्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकला पाहिजे. त्याचवेळी काही लोक संपूर्ण हिंदी सिनेमावर म्हणजेच बॉलिवूडवर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत.

एका युजरने ट्वीट करून लिहिले की, “एकेकाळी त्याने सुशांतचा अपमान केला होता. आता त्याच अपमानाचा बदला घेण्याची बारी आहे. बॉलिवूडवर पूर्ण बहिष्कार टाकूया.” तर एकाने लिहिले की, “शाहरुख आणि शाहिदने ज्या प्रकारे सुशांतची खिल्ली उडवली, ते आम्ही कधीही विसरू शकत नाही. चला सर्वांनी मिळून हा चित्रपट सुपर फ्लॉप बनवूया.” याशिवाय सुशांतचे चाहतेही अभिनेता सुशांत सिंग राजपूतला न्याय द्यावा आणि चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत.

यापूर्वी हा चित्रपट कायदेशीर वादातही अडकला होता. वास्तविक रजनीश जयस्वाल यांनी ‘जर्सी’ने त्यांच्या स्क्रिप्टची चोरी केल्याचा आरोप केला होता, त्यानंतर कायदेशीर अडचणीमुळे चित्रपटाचे प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आले होते. याआधी हा चित्रपट १४ एप्रिलला प्रदर्शित होणार होता, पण नंतर तो पुढे ढकलण्यात आला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने ‘जर्सी’च्या निर्मात्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर, आता हा चित्रपट २२ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा