×

‘मलाही दाखवा माझा बंगला’, आलिशान बंगल्याची अफवा पसरल्यावर खुद्द ‘जेठालाल’ने केला होता खुलासा

टेलिव्हिजन क्षेत्रात अनेक मालिकांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले, आणि सोबतच कलाकारांना देखील तुफान प्रसिद्धी मिळवून दिली. असे अनेक कलाकार होते, ज्यांना चित्रपटांमध्ये अपेक्षित यश न आल्याने त्यांनी टीव्ही इंडस्ट्रीकडे त्यांचा मोर्चा वळवला आणि त्यांचा हा निर्णय अगदी सार्थकी झाला. या कलाकारांना टीव्हीने अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. कदाचित ही लोकप्रियता चित्रपटांपेक्षा अधिकच असेल. याच्याशी साधर्म्य असणारे एक कलाकार म्हणजे दिलीप जोशी.

तुमच्या आमच्या लाडक्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील जेठालाल गडा म्हणजेच दिलीप जोशी यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांनी त्यांच्या अभिनयाने संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण केली. या मालिकेने प्रत्येक कलाकाराला एक नवीन ओळख आणि नाव दिले. या सर्वांमध्ये गडा इलेक्ट्रॉनिक्सचे मालक असलेली जेठालाल गडा मात्र भाव खाऊन गेले.

दिलीप जोशी हे कौटुंबिक व्यक्ती आहेत. कामातून वेळ मिळाल्यावर ते कुटुंबासोबतच असतात. सोशल मीडियावर देखील ते फार सक्रिय नसतात. दिलीप जोशींनी मागच्यावर्षी इंस्टाग्रामवर अकाऊंट चालू केले, त्यावर देखील ते क्वचितच पोस्ट शेअर करतात.

मात्र, दिलीप जोशी एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले होते. सोशल मीडियावर दिलीप जोशींकडे आलिशान बंगला असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यात म्हटले होते की, दिलीप जोशी हे एका मोठ्या बंगल्यात राहतात, ज्या बंगल्यात मोठा स्विमिंग पूल देखील आहे. मात्र, दिलीप जोशींनी स्वतः याबद्दल खुलासा करताना सांगितले होते की, “जर खरंच असे असेल, तर मलाही माझा असा आलिशान बंगला पाहायला नक्कीच आवडेल.”

त्यांनी सांगितले होते की, त्यांच्याकडे असा कोणताही बंगला नाहीये. ही अफवा इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरली की, यामुळे दिलीप जोशींच्या जवळच्या मित्रांना देखील त्यांचा बंगला आहे असे वाटत होते. त्यांचे मित्रसुद्धा त्यांना याबद्दल विचारायचे. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्याकडे असा कोणताही बंगला नाही.

दिलीप जोशी यांच्याबद्द्दल सांगायचे झाले, तर त्यांनी २००८ मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत काम करायला सुरुवात केली. या मालिकेने त्यांना यशाच्या शिखरावर बसवले, सोबतच १६ पुरस्कारही मिळवून दिले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आनंदाची बातमी! ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच करणार पुनरागमन; कृष्णा अन् भारतीने दिली हिंट

-‘द फॅमिली मॅन’च्या ‘सुची’नं केलंय शाहरुख खानसोबत काम; आजही सांभाळून ठेवलीय अभिनेत्याने दिलेली ‘ही’ गोष्ट

-‘शालू’च्या डान्सने पुन्हा चोरली लाखो मने; बघता बघताच पडला लाईक अन् कमेंट्सचा पाऊस

Latest Post