आहा कडकच ना! नोरा फतेहीचा मराठमोळा लूक वेधतोय सर्वांचं लक्ष, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

0
153
Nora-Fatehi
Photo Courtesy: Instagram/norafatehi

बॉलिवूडची सुपर हॉट अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही हिने तिच्या लूक आणि अप्रतिम ड्रेसिंग सेन्सने सर्वांची मने जिंकली आहेत. नोरा पुन्हा एकदा तिच्या पेहरावामुळे चर्चेत आली आहे, पण यावेळी वेस्टर्न आऊटफिट्ससाठी नाही, तर पारंपारिक लूकमुळे. अलीकडेच ती हिरव्या रंगाच्या साडीत दिसली. तिने ही साडी मराठमोळ्या अंदाजात नेसली होती. नोराचा हा मराठी लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

या व्हिडिओमध्ये नोरा फतेही (Nora Fatehi) हिरव्या रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. नोराने साडीसोबत फुल स्लीव्ह हेवी ब्लाऊज घातला आहे. नऊवारी साडीसोबतच नोराने नथही मराठी स्टाईलमध्ये परिधान केली आहे. कानात झुमके आणि केसांची पोनीटेल तिच्यावर खूप सुंदर दिसत आहे.

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नोराचा हा लूक चाहत्यांना एवढा आवडला आहे की, ते या व्हिडिओवर सतत कमेंट करत आहेत. यावर एका युजरने कमेंट करत लिहिले की, “कोणी इतके सुंदर कसे असू शकते.” दुसर्‍या एका युजरने कमेंट करत लिहिले की, “मला नोरा पहिल्यांदाच इतकी सुंदर दिसत आहे.” अनेक चाहत्यांनी लिहिले की, “आता फक्त आम्हाला शिट्टी वाजवण्याची इच्छा आहे.”

हेही वाचा- आता घाबरायचं कामच नाही! 23 चित्रपट निर्मात्यांचा नेपोटिझमवर हल्ला; नवीन कलाकारांसाठी बनवला प्लॅटफॉर्म

नोरा फतेही तिच्या अभिनयाव्यतिरिक्त तिच्या डान्स मूव्हजसाठी देखील ओळखली जाते. तिचा ‘डर्टी लिटल सीक्रेट’ जूनमध्ये रिलीज झाला होता, पण इतक्या महिन्यांनंतरही या ट्रॅकची क्रेझ कायम आहे. या गाण्याच्या व्हिडिओतील नोराचा लूकही अप्रतिम आहे. हे गाणे इंग्रजीमध्ये आहे आणि नोरा इंग्रजी गाण्याच्या तालावर तिच्या डान्स मूव्हजने लोकांना आश्चर्यचकित करताना दिसत आहे. सध्या नोरा फतेही टीव्ही रिऍलिटी शो ‘झलक दिखला जा 10’मध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ ‘झलक दिखला जा 10’च्या सेटवरून स्पॉट करण्यात आला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
महेश बाबूची पत्नी नम्रताने दिवंगत सासूबाईंसाठी लिहिली भावूक पोस्ट; म्हणाली, ‘तुम्ही दिलेलं प्रेम…’
‘केसरिया’ गाण्यावरून अयान मुखर्जीवर भडकलेला करण जोहर, पण काय होते कारण?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here