Monday, July 15, 2024

सीतेने ‘राम’ अरुण गोविलच्या पायाला केला स्पर्श; म्हणाली, ‘मी तुझी दासी आहे’

झलक दिखला जा 10‘ या डान्स रिऍलिटी शोमध्ये अनेकदा नवीन स्टार्स सहभागी होताना दिसतात. अलिकडेच शोमध्ये  ‘राम’ आणि ‘सीता’ म्हणजेच अरुण गोविल आणि रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मधून लोकप्रिय झालेले दीपिका चिखलिया पाहुणे म्हणून आले होते. अनेक दशकांपूर्वी ऑनस्क्रीन राम-सीतेची भूमिका साकारणारे हे तारे आजही त्यांच्या पात्रांसाठी लोकप्रिय आहेत. दरम्यान, जेव्हा ही लोकप्रिय जाेडी ऑन-स्क्रीन ‘झलक दिखला जा 10’ च्या सेटवर पोहोचली तेव्हा दीपिका चिखलियाने असे काही केले की सर्वजण थक्क झाले.

शोमध्ये दीपिका चिखलिया (dipika chikhlia) हिने सर्वांसमोर अरुण गोविल (arun govil) यांच्या पायांना स्पर्श केला आणि त्यांना आपला देव असल्याचे सांगितले. दीपिका आणि अरुणच्या उपस्थितीसह या विशेष भागाचा प्रोमो निर्मात्यांनी शेअर केला आहे, ज्यामध्ये दीपिका चिखलिया स्वतःला ‘राम’ची दासी सांगत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

अरुण गोविलने सेटवर एक अभिनयही केला आणि म्हणाले, “माझी पहिली सूचना आहे की, कधीही माझी दासी होऊ नका. माझी पत्नी, मित्र आणि सोबती होण्यासाठी. माझ्यासोबत जगा.” अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनी रामायणातील राम आणि सीतेची भूमिका अशा प्रकारे साकारली होती की, आजपर्यंत प्रेक्षक या पात्रातील इतर कोणत्याही अभिनेत्याला स्वीकारू शकले नाहीत.

टीआरपीच्या बाबतीत ‘गेम ऑफ थ्रोन्स’लाही टाकले मागे
कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा हि मालिका प्रसारित करण्यात आल्याने प्रेक्षकांमध्ये रामायणाची क्रेझ पुन्हा एकदा पाहायला मिळाली. अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी यांच्या रामायणला प्रेक्षकांनी 90 च्या दशकात जेवढे प्रेम दिले होते तेवढेच प्रेम लॉकडाऊनमध्येही मिळाले. जेव्हा रामायण दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित झाले तेव्हा टीआरपीच्या बाबतीत प्रसिद्ध मालिका ‘गेम ऑफ थ्रोन्स’लाही मागे टाकले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
प्रभासच्या वाढदिवसानिमित्त ओम राऊतने ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे नवे पोस्टर केलं शेअर

लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘सिद्धू’ने 5 वर्षे बघितली होती खऱ्या प्रेमाची वाट, वाचा त्याचा जीवनप्रवास

हे देखील वाचा