Wednesday, December 6, 2023

बापरे बाप! जान्हवी कपूरला मोडायचे होते ऐश्वर्या-अभिषेकचे लग्न, हाताची नस कापून केलेला आत्महत्येचा प्रयत्न

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे बॉलिवूडमधील पावरफुल कपल म्हणून ओळखले जाते.अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चनने 20 एप्रिल 2007 रोजी विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या रायशी लग्न केले. एकीकडे चाहत्यांना या बॉलिवूड लग्नाची खूप उत्सुकता होती, तर दुसरीकडे असे अनेक लोक होते ज्यांना ऐश्वर्या आणि अभिषेकने लग्न करावे असे वाटत नव्हते. या दुसऱ्या वर्गात अभिनेत्री जान्हवी कपूरचाही समावेश आहे, ज्याने लग्न थांबवण्यासाठी आपल्या हाताची नसही कापली होती. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या शाही विवाह सोहळ्याची आजही चर्चा होताना दिसते. बॉलिवूडमधील सर्वात विवाह सोहळा म्हणून या लग्नाची चर्चा होत असते. मात्र जशा या लग्नाच्या गोड आठवणी आहेत त्याचप्रमाणे काही कटू आठवणीही आहेत. यापैकी जान्हवी कपूरचे प्रकरण प्रचंड गाजले होते. या लग्नाला जान्हवीचा लग्नाला विरोध होता. एकीकडे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायचे लग्न सुरू होते, तर दुसरीकडे अभिनेत्री जान्हवी कपूरने आपली नस कापली. जान्हवीने सांगितले की, तिचे आधीच अभिषेक बच्चनसोबत लग्न झाले आहे आणि ती त्याची पत्नी आहे. एवढेच नाही तर जान्हवीने मीडियासमोर आपली नसही कापली आणि तिने जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्नही केला.

जान्हवी कपूरने मीडियासमोर अभिषेकवर आरोप केला की, त्याने जान्हवीची फसवणूक केली आहे, तिचा विश्वासघात केला आहे. सुरुवातीला ही गोष्ट थोडी दडपली होती पण नंतर जेव्हा अभिषेक बच्चनने आरोप फेटाळून लावले तेव्हा या मॉडेलने अभिषेकच्या घराबाहेर आपली नस कापली आणि अभिषेकवरील आपले प्रेम सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण हा किस्सा श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरबद्दल बोलले जात नाही, तर आम्ही तुम्हाला आणखी एका मॉडेल आणि अभिनेत्री जान्हवी कपूरबद्दल सांगत आहोत. या अभिनेत्रीने अभिषेक बच्चनसोबत ‘दस’ चित्रपटात काम केले होते.(jhanvi kapoor attempt suicide cut her wrist to stop aishwarya rai abhishek bachchan wedding)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या लग्नावर सलमान खानने दिली होती प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी ऐश्वर्याच्या…’
बिग बॉसची ही स्पर्धक दुसर्यांदा अडकणार लग्न बंधनात; मोठ्या बिझनेसमन बरोबर थाटणार संसार

हे देखील वाचा