Monday, July 1, 2024

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत दिसली जान्हवी कपूर, ब्रेकअपनंतर पुन्हा येणार एकत्र?

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर(Jhanvi Kapoor) नेहमीच तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे चर्चेत असते. जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘मिली’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही खूप चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जान्हवी तिच्या कथित एक्स बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर तिचा कथित एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर गुलाबी रंगाचा सूट घालून रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींना पाहून जान्हवी हसली आणि सरळ कारमध्ये बसली. जिथे तिचा एक्स बॉयफ्रेंड शिखर आधीच ड्रायव्हिंग सीटवर बसलेला दिसतो.

 

View this post on Instagram

 

जान्हवी कपूरला एक्स बॉयफ्रेंड शिखरसोबत कारमध्ये पाहून दोघांच्या डेटिंगच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. अभिनेत्री शिखरसोबत पुन्हा रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज लोक बांधत आहेत. एवढेच नाही तर दिवाळीच्या मुहूर्तावर जान्हवी कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडियांनी काही काळ एकमेकांना डेट केले, त्यानंतर ते वेगळे झाले. ‘कॉफी विथ करण 7’ मध्ये, करण जोहरने डेटिंगच्या अफवांना पुष्टी दिली आणि म्हटले की तो माझा भूतकाळ होता.

जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘मिली’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी पहिल्यांदाच तिचे वडील बोनी कपूरसोबत काम करत आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. मिली व्यतिरिक्त जान्हवी वरुण धवनसोबतही धमाल करताना दिसणार आहे. जान्हवी राजकुमार रावसोबत मिस्टर अँड मिसेस माहीमध्येही काम करत आहे. एकूणच जान्हवीकडे सध्या भरपूर चित्रपट आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एम एस धोनी करतोय चित्रपटात आगमन, बॉलिवूड नाहीतर साउथमध्ये करणार पदार्पण

प्रतिक्षा संपली! अ‍ॅक्शन, थ्रिलर, सस्पेंसने भरलेला ‘यशोदा’चा दमदार ट्रेलर होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

हे देखील वाचा